मुंबई : ते आले आणि त्यांनी जिंकल... असंच काहीस 2018 मधील बॉलिवूड कलाकारांसोबत घडलं आहे. कधी कुणाला वाटलंच नव्हतं की, 2018 हे वर्ष आणि बॉक्स ऑफिस या बॉलिवूड कलाकारांनी गाजेल.
यामध्ये सहभाग आहे विक्की कौशल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, राधिका आपटे आणि तापसी पन्नू. या कलाकारांनी यंदा बॉलिवूड स्टार्सना देखील मागे टाकलं आहे.
बॉलिवूडकरता हे वर्ष छोट्या बजेटच्या सिनेमांनी भरपूर गाजवलं. 'छोटा पॅकेट बडा धमाका' असल्याचं या सिनेमांनी सिद्ध केलं. त्यामुळे हे Year Ender 2018 स्टार ठरले आहेत.
यंदा 2018 मध्ये सलमान खानचा 'रेस 3' आमिर आणि अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अगदी तोंडावर पडले. तर नुकताच प्रदर्शित झालेला 'झिरो' या सिनेमाने देखील चाहत्यांना नाराज केलं आहे.
सिनेमात मोठे स्टार असूनही या सिनेमांनी काही खास कमाल केलेली नाही. दुसऱ्या ठिकाणी 'बधाई हो', 'राझी' आणि 'मनमर्जिया'सारख्या सिनेमांनी प्रेक्षकांच आणि समिक्षकांची मन जिंकली.
या सिनेमात सगळे आताचे बॉलिवूड कलाकार आहेत. 300 करोड रुपयांच बजेट असलेल्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाने फक्त 150 करोड रुपयांची कमाई केली. तर 'बधाई हो' या सिनेमाने 135 करोड रुपयांची कमाई केली आहे.
यावर्षी 'स्त्री'सिनेमाने 125 करोड रुपयांची कमाई केली असून 'अंधाधुन' सिनेमाने 73.5 करोड रुपयांची कमाई केली तर 'राझी' ने तर 122 करोड रुपयांची कमाई केली आहे.
अभिनेता विक्की कौशलने 'लव स्कायर फुट'च्या माध्यमातून डिजिटल मंचावर पाऊल ठेवलं. आणि 'लस्ट स्टोरीज'च्या माध्यमातून आपलं यश अधोरेखित केलं. यानंतर मोठ्या पडद्यावर मेघना गुलझार यांच्या 'राझी' सिनेमातून खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात केली. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला 'संजू' हा सिनेमामध्ये विक्कीचं काम कौतुकास्पद होतं. 'मनमर्झिया' या सिनेमात तर विक्कीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.
डिजिटल मंचावर धमाल केल्यानंतर राधिकाने यावर्षी 'पॅडमॅन', 'अंधाधुन' आणि 'बाजार' या सिनेमात उत्तम अभिनय केला होता. आतापर्यंत आपल्या 10 वर्षांच्या करिअर स्पॅनमध्ये राधिकाने हिंदी, तमिळ, तेलुगु, तमिळ आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
राधिकाप्रमाणेच यावर्षी तापसी पन्नूने देखील 'मनमर्झिया' आणि 'मुल्क'सारखे हिट सिनेमे दिले. तसेच यंदा 'जुडवा 2' या सिनेमात तिने अगदी कॉमेडी अवतार दाखवला.
पण हे वर्ष पूर्णपणे आयुष्मान खुरानाच्या नावावर राहिलं. 'अंधाधुन' आणि 'बधाई हो' सारख्या सिनेमाने एकूण 200 करोड रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या दोन्ही सिनेमांची कथा अगदी वेगळी होती. या सिनेमांना प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी खूप पसंत केलं.
राजकुमार रावने यावर्षी सुरूवातीला 'ओमेर्टा' आणि 'फन्ने खान' सारखे सिनेमे दिले. जे काही एवढे खास चालले नाहीत. मात्र वर्षाच्या अखेरीस त्याला यश मिळायला सुरूवात झाली. 'स्त्री' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 करोड रुपयांची कमाई केली आहे.