'या' प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेलची आई आयसीयूमध्ये दाखल, भावूक पोस्ट शेअर

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान आजकाल बर्‍याच संकटांतून जात आहे.

Updated: Jul 17, 2021, 08:02 PM IST
  'या' प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेलची आई आयसीयूमध्ये दाखल, भावूक पोस्ट शेअर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान आजकाल बर्‍याच संकटांतून जात आहे. खरं तर बरेच दिवस झरीनच्या आईची तब्येत ठीक नव्हती. या कारणास्तव, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या झरीनची आई आयसीयूमध्ये दाखल आहे. अशा परिस्थितीत आता झरीनला आपल्या आईबद्दल खूप चिंता वाटत आहे.

झरीनने स्वत: दिली माहिती
स्वत: झरीनने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आईच्या बिघडत्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे. ज्यात तिची चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माझी आई पुन्हा रुग्णालयात दाखल झाली आहे आणि आयसीयूमध्ये आहे. कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा.

झरीनची आई या पूर्वीही होती आजारी 
झरीनच्या वाढदिवसाशीसुद्धा तिच्या आईची तब्येत बिघडली. तेव्हा तिच्या आईला रुग्णालयात दाखल करावं लागलं. याबाबत माहिती देताना तिने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलंय की, 'मला माहित आहे की, मी ईदच्या शुभेच्छा द्यायला आणि वाढदिवसाबद्दल धन्यवाद म्हणायला खूप लेट झाली आहे.'

झरीन या चित्रपटाविषयी चर्चेत आहे
जरीनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकतीच ती 'हम भी अकले तुम भी भी अकेले' चित्रपटात दिसली. सध्या ती 'पटाके पएंगे' या पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीप कांग करीत आहेत.