आलियाच्या फोन कव्हरवर रणबीरचा Lucky Number

आलियाने आतापर्यंत अनेकदा रणबीरसोबतच्या नात्याबद्दल काही किस्से शेअर केले आहेत . सोशल मीडियावर देखील या लव्ह बर्डसचे फोटो खूपच व्हायरल होत असतात.  

Updated: Jul 17, 2021, 07:47 PM IST
 आलियाच्या फोन कव्हरवर रणबीरचा Lucky Number  title=

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वांत क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट गेल्या 2 वर्षांपासून एकत्र आहेत. एक वेळ अशी होती जेव्हा रणबीर कपूर आलियाचा क्रश होता. पण त्यानंतर दोघेही रिलेशनशीपमध्ये आले. वेगवेगळ्या इव्हेंटला ही जोडी सोबत दिसू लागली. आलियाने आतापर्यंत अनेकदा रणबीरसोबतच्या नात्याबद्दल काही किस्से शेअर केले आहेत . सोशल मीडियावर देखील या लव्ह बर्डसचे फोटो खूपच व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी आलिया भट सध्या 40 दिवसचं फिटनेस चॅलेंज पुर्ण करत आहे. हे चॅलेंज पुर्ण करत असताना तिने नुकताच एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यात आलियाचा फिट अंदाज सगळ्यांचच लक्षवेधून घेतो आहे. आलियाच्या या फिटनेस चॅलेंजचे 20 दिवस नुकतेच पुर्ण झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

त्यात आलियाने शेअर केलेल्या या सेल्फीमधील तिच्या मोबाईल कव्हरमुळे देखील एक वेगळीच चर्चा रंगते आहे.ज्याचं कनेक्शन हे रणबीर कपूरसोबत असल्याचं समजतंय. आलियाच्या या फोन कव्हरवर एक नंबर दिसून येत आहे. आणि या नंबरच्या पुढे हार्ट इमोजी दिसून येत आहे. रणबीर कपूरसाठी हा नंबर खूपच लकी आहे. त्यामुळे आलियाने हा नंबर चक्क आपल्या मोबाईलच्या कव्हरवर देखील ठेवला आहे.

रणबीर कपूरचा लकी नंबर 8

रणबीर कपूरचा लकी नंबर 8 आहे. मागील वर्षी आलियाने रणबीर कपूरच्या बर्थडेच्या केकचा एक फोटो शेअर केला होता.आणि कॅप्शनमध्ये हॅपी बर्थडे 8 असं लिहिलं होतं. या पोस्टवरुन आलियाला म्हणायचं होत , की रणबीर कपूर तिच्यासाठी लकी नंबर 8 आहे. आणि ती रणबीरवर खूप प्रेम करते.

आलियाच्या फोटोवर कतरिना कैफची प्रतिक्रिया 

आलियाने फिट अंदाजातील फोटो शेअर केल्यानंतर रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफने देखील कमेंट करत पसंती दर्शवली आहे, तर मलायका अरोराने देखील आलियाचं कौतक केलं आहे.