नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान सलमानसोबत 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेली अभिनेत्री झरीन खान सध्या भलतीच चर्चेत आली आहे. ही चर्चा तिने चित्रपट निर्मात्यावर आरोप केल्यामुळे सुरू झाली आहे.
झरीन खानचा 'अक्सर 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला. दरम्यानच्या काळात तिने प्रसारमाध्यमांमधून या चित्रपटाच्या निर्मात्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. आपल्या आरोपात ती म्हणते मला न सांगता या चित्रपटात लांबच लांब 'Kissing Scenes' सिन घेतले. इतकेच नव्हे तर, मला तोकडे कपडे घालण्यासाठीही मजबूर करण्यात आले. चित्रपटात इतके सेक्शुअल दृश्ये चित्रीत करण्यात आली की, या दृश्यांना केवळ अश्लिलच म्हणता येऊ शकते, असा आरोपही झरीनने केला आहे. झरीनने केलेले हे सर्व आरोप Spotboyeला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत.
'अक्सर 2' सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मला तोकडे घालण्यासाठी मजबूर करण्यात आले. चित्रिकरणास निश्चित कालावधीपेक्षा खूपच विलंब लागला. हा विलंब केवळ वारंवार कपडे बदलण्यामुळे झाला. इतका की, मला प्रत्येक फ्रेमसाठी छोटे छोटे कपडे वापरावे लागत होते. चित्रपटाची स्टोरी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला 'हेट स्टोरी-3' सारख्या चित्रपटात काम करायचे नाही, असे मी सांगितले होते. त्यावर 'अक्सर-2' हा एकदम क्लिन चित्रपट असेल असे मला सांगण्यात आले होते. मात्र, नंतर सगळेच बदलले असा आरोपही झरीनने केला आहे.
आपले आरोप कायम ठेवत झरनीनने म्हटले आहे की, मला चित्रपटाच्या प्रायव्हेट स्क्रिनिंगसाठीही इनवाइट करण्यात आले नाही.
दरम्यान, झरनीनने आरोप तर केले. पण, त्यावर अद्याप कोणाकडून प्रतिक्रीया आली नाही. आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार याबाबत उत्सुकता आहे.