मुंबई : दिवाळी विशेष मागच्या भागात आपण पाहिलं की महाराजा प्रदीप सिंग उर्फ बच्चू जोशी यांची 'चला हवा येऊ द्या'च्या (Chala Hawa Yevu Dya) मंचावर एन्ट्री झाली आणि त्यांनी सर्व कलाकारांना बंदी बनवून राजाला हसवण्याचा शिक्षा दिली. हा राजा आता प्रत्येक आठवड्यात प्रत्येक भागात समोरच्या सिंहासनावर बसून कॉमेडीचा आनंद घेईल आणि दिलखुलास मजा करताना दिसणार आहे.
या आठवड्यात 'चला हवा येवू दया'च्या मंचावर 'देवमाणूस' (Devmanus) मधील डॉक्टर अजित आणि डिम्पल, 'अग्गबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मधील बबड्या आणि शुभ्रा, 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jiv Rangala) मधील राणा आणि अंजली यांनी हजेरी लावली.
यावेळी महाराजा प्रदीप सिंग उर्फ बच्चू जोशी चीखूप मोठी फॅन असलेली ‘अस्मिता देशमुख’ म्हणजेच सर्वांची लाडकी 'देवमाणूस' मधील डिम्पल हिने स्वप्नील जोशी सोबत 'टिक टिक वाजते डोक्यात' या गाण्यावर डान्स केला आणि त्याच्यासाठी 'गुंतलेला श्वास हा' हे गाणं देखील म्हटलं.
यावेळी हवा येऊ द्या मधील कलाकारांनी 'देवमाणूस आणि अग्गबाई सासूबाई' या मालिकांच स्पूफ सादर करून एकचं हास्य धमाका उडवून दिला. 'हवा येऊ द्या'च्या नवीन फार्महाऊस मधून एक विमान उडत आहे, ज्यात आपल्या झी मराठीचे कलाकार अडकले आहेत त्यांच्या अतरंगी फॅन्स बरोबर पुढे काय होणार ? हे कॉमेडीचं विमान कुठे लँड करणार ? हे मजेशीर किस्से पाहायला मिळणार आहेत. हास्याने लोटपोट करणारे हवा येऊ द्या चे हे मजेशीर भाग २३ ते २५ नोव्हेंबर रात्री ९.३० ते १०.३० झी मराठीवर पाहता येणार आहेत.