मृत्यूने मला लवकर घेऊन जावं... प्रार्थना करा; मराठमोळ्या अभिनेत्याची भावनिक पोस्ट

कारण मात्र अद्याप अस्पष्ट 

Updated: Nov 20, 2020, 01:19 PM IST
मृत्यूने मला लवकर घेऊन जावं... प्रार्थना करा; मराठमोळ्या अभिनेत्याची भावनिक पोस्ट

मुंबई : मराठी कलाविश्वात नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता राजन पाटील यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं सध्या प्रचंड खळबळ माजली. मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा... असं म्हणणारी त्यांची ही पोस्ट अनेकांच्याच मनात कालवाकालव करुन गेली.

चाहतेही त्यांच्या या पोस्टवर असे काही व्यक्त झाले की, या अभिनेत्यानं आयुष्यातील आव्हानं पुन्हा पेलण्यासाठी हा अभिनेता सज्ज झाला. 'नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय', अशी पोस्ट पाटाली यांनी केली.

राजन पाटील यांनी केलेली ही पोस्ट आणि त्यामागचं कारण अद्यापही उमगलेलं नाही. पण, हे शब्द आणि त्यांची तळमळ पाहून अनेकांनाच धक्का लागला. परिणामी कमेंट बॉक्समध्ये सारेच व्यक्त होण्यास सुरुवात झाली. हक्क गाजवत अनेकांनी राजन पाटील यांना जागं केलं.

पाटील यांनी केलेली दुसरी पोस्ट ही काहीशीदिलासा देणारी होती. कारण जी हार पत्करत त्यांनी पहिली पोस्ट लिहिली होती, तीच दूर लोटत आव्हानांचा सामना करण्यास आपण सज्ज असल्याची तयारी त्यांनी दुसऱ्या पोस्टमधून दाखवली. एका कलाकारीच हतबलवाणी ऐकून त्यांचे सहकारी आणि चाहत्यांचं असं व्यक्त होणं हे सारंकाही एका अव्यक्त नात्याचीच अनुभूती देणारं आहे.