झी टॉकीज साजरा करणार जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस

दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीजवर वर त्यांच्या खास चित्रपटांचा नजराणा

Updated: Aug 3, 2020, 11:05 AM IST
झी टॉकीज साजरा करणार जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस title=

मुंबई : आपल्या अष्टपैलु अभिनयातुन मराठी व हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख  निर्माण करणारे मराठी अभिनेते अनेक आहेत. पण एखाद्या भूमिकेत स्वतःला सहज सामाऊन घेणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांची गोष्ट काही वेगळीच आहे. युवकांना ही  लाजवेल असा त्यांचा उत्साह आपल्या सर्वांना नेहमी बघायला मिळतो. १९७२ मध्ये त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. याकाळात सिनेमा, नाटक, मालिका अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला.

४ ऑगस्ट रोजी ते ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. म्हणूनच झी टॉकीज घेऊन येत आहे एक विशेष चित्रपट महोत्सव 'दिलीप प्रभावळकर वाढदिवस विशेष'. यामध्ये ५ विशेष चित्रपटांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील पहिला चित्रपट असणार आहे 'एक डाव भुताचा'. रवी नामाडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रंजना, मोहन कोठीवान, राम नगरकर, सुलोचना आणि मोहन जोशी यांनी अभिनय केला आहे. या विनोदी चित्रपटात आपल्याला अनेक कुरकुरीत पंच लाईन ऐकायला मिळणार आहेत.

सकाळी ९ वाजता हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.यानंतर  ११ वाजता 'धरलं तर चावतंय' हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशोक सराफ, रेखा राव, लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, प्रिया अरुण आणि विजय पाटकर यांच्यासह दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पुढील चित्रपट असणार आहे 'बोक्या सातबंडे'. दिलीप प्रभावळकरांनी लिहलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. राज पेंडुरकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दुपारी १.३० वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संध्याकाळी ७ वाजता 'जयजयकार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका वृद्धच्या आयुष्याभोवती फिरणारा हा  चित्रपट आहे, एका विशिष्ट समुहाची मदत  करण्याचं हा वृद्ध  ठरवतो. त्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या महोत्सवाचा शेवट 'झपाटलेला' या सुपरहिट चित्रपटाने होणार आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला 'तात्या विंचू' अनेकांचा अजूनही थरकाप उडवतो. रात्री ९. ३० वाजता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाने नटलेल्या, या चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी पाहायला विसरु नका हा विशेष चित्रपट महोत्सव ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९. ३० या वेळेत फक्त आपल्या झी टॉकीजवर.