'टॉकीज मनोरंजन लीग'मध्ये येत्या रविवारी ऍक्शनचा धमाका

कोरोनाकाळात कुटुंबासोबत घालवा वेळ 

Updated: Apr 16, 2021, 04:09 PM IST
'टॉकीज मनोरंजन लीग'मध्ये येत्या रविवारी ऍक्शनचा धमाका

मुंबई : महाराष्ट्राची लाडकी वाहिनी झी टॉकीज हि नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार चित्रपट, खास कार्यक्रम सादर करून या वाहिनीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे आणि यापुढेही करत राहील. एप्रिल महिन्यात झी टॉकीजवर मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी होत आहे कारण झी टॉकीज वाहिनीवर 'झी टॉकीज मनोरंजन लीग' सुरु आहे.

या लीगमध्ये एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी संपूर्ण दिवस ब्लॉकबस्टर चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत. यात भक्तिपर आणि कॉमेडी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांनी अनुभवली. येत्या रविवारी टॉकीज मनोरंजन लीग मध्ये  
ऍक्शन चित्रपटांचा धमाका होणार आहे. एका पेक्षा एक ऍक्शन चित्रपट येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. सकाळी ९ वाजता प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी या सुपरहिट जोडीचा 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या अभेटीस येईल.

दुपारी १२ वाजता ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुळशी पॅटर्न', दुपारी ३ वाजता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सदाबहार चित्रपट 'धडाकेबाज' आणि संध्याकाळी ६ वाजता 'माझा छकुला' हा धमाकेदार चित्रपट सादर होईल. रात्री ९ वाजता रितेश देशमुख याच्या 'लय भारी' या चित्रपटाने टॉकीज मनोरंजन लीग मधील ऍक्शन चित्रपटाच्या मॅरेथॉनचा शेवट होईल.

त्यामुळे धमाकेदार ऍक्शन पॅक्ड चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'टॉकीज मनोरंजन लीग' रविवार १८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून फक्त आपल्या झी टॉकीजवर