Foods for Constipation: रोजच्या क्रम सुरळीत राहण्यासाठी भूक लागणं, नीट व पुरेशी झोप या क्रिया जशा अत्यंत महत्त्वाच्या असतात तसंच, सकाळी पोट साफ होणं, हे देखील महत्त्वाचे असते. मात्र, सकाळ-सकाळ पोट साफ न झाल्यास चिडचिड होते. फ्रेश वाटत नाही, अशा अनेकांच्या तक्रारी असतात. हल्ली 10 पैकी 7 जणांना दररोज बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळं मूड स्विंग होण्याची समस्याही पाहायला मिळते. पोट साफ होण्यास त्रास होणे यामुळं तुम्हीदेखील हैराण असाल तर हे घरगुती उपाय करुन पाहा.
बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठांनादेखील या समस्येचा सामना करावा लागू शकतो. बद्धकोष्ठतेमुळं एखाद्याला आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त दिवस शौचास होत नाही. त्यामुळं पचनासही त्रास होतो. पोट साफ न होण्याची अनेक कारणे असू शकतात. कमी प्रमाणात पाणी पिणे, जेवणात फायबर्सचा अभाव, यामुळं बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
लिक्विड डाएटने बद्धकोष्ठतेवर घरगुती उपायाने मात करता येते. त्यासाठी तुम्हाला दिवसभरातून तीन ते चार लीटर पाणी तर प्यायचेच आहे. मात्र, त्याचबरोबर काही डिटॉक्स ड्रिंकचेदेखील सेवेन करु शकता. जसं की पायनॅपल डिटॉक्स वॉटर, अॅपल साइडर व्हिगेनगर वॉटर, काकडीने बनवलेले डिटॉक्स ड्रिंक किंवा फ्रूट इन्फ्यूजिंग वॉटर. हे सर्व ड्रिक लिव्हर डिटॉक्स करण्याचे काम करतात.
हिरव्या भाज्या फायबर, पॉटेशियम, व्हिटॅमिन आणि अन्य पौष्टिक तत्वांनी युक्त असतात. ज्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेवर लगेचच आराम मिळतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक आवर्जून खा. यात फायबर, व्हिटॅमिनची मात्रा चांगली असते. त्याचबरोबर, केल, दुधी यासारख्या भाज्यादेखील खाऊ शकता. अधिक प्रमाणात फायबर हवे असल्यास तुम्ही हिरव्या भाज्याच्या व्यतिरिक्त गाजर आणि टॉमेटोही सलाडमध्ये खावू शकता.
दररोज 1 ते 2 मोठे चमचे नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या लक्षणांपासून आराम मिळेल. नारळाचे तेल आतड्यातील घाण खेचून काढते. त्यात अँटीऑक्सिडेंटचे उच्च मात्रा आढळते. ज्यामुळं बद्धकोष्ठतेसह कँन्सरसारख्या आजारांवरही मात करण्यास बळ देते.
पपईचे सेवन पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. खासकरुन जे बद्धकोष्ठतेमुळं त्रासलेले आहेत त्यांनी पपईचे सेवन आवर्जुन करावे. पपईत फायबर, व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सीची अधिक मात्रा असते. जे लिव्हर डिटॉक्सचे काम करते आणि बद्धकोष्ठतेवर आराम देते. ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी रोज पपईचे सेवन करावे.
लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे त्यामुळं पाचनतंत्रात सुधार येते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे. लिंबाचा रस कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)