चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?

Beauty Tips : वाढलेले प्रदुषण यामुळे निस्तेज होणारा चेहरा तेजस्वी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक वेळा आपण चेहरा धुवतो. पण दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा? हे तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Jun 11, 2023, 02:41 PM IST
चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?  title=
Are you making these mistakes washing your face and How many times a day do you wash your face beauty tips in marathi

Beauty Tips : गेल्या काही वर्षांपासून मेकअप वापऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चेहऱ्याचं निसर्ग सौंदर्य आपण हरवून बसलो आहे. त्यात सूर्य, वारा आणि प्रदुषणाचा मारा आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा सुंदर आणि तेजस्वी ठेवण्यासाठी आज बाजारात विविध प्रोडक्ट आले आहेत. पण तरीही देखील अनेक जण चेहरा धुताना ही चुक करतात. शिवाय दिवसातून किती वेळा चेहरा धुवायला पाहिजे हे माहिती नसतं. 

धक्कादायक माहिती समोर 

अमेरिकेतमधील स्किन केअर ब्रँडने एका सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार अर्ध्याहून अधिक लोकांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. या सर्वेक्षणात 1000 स्त्री-पुरुषांचा अभ्यास करण्यात आला.  या सर्वेक्षणतर्गंत त्यांनी सांगितलं की, झोपण्यापूर्वी ते चेहरा धुवण्यास विसरतात. त्याशिवाय चेहरा धुवताना ते कायम एक चूक करतात. कदाचित ती चूक तुम्ही करत असाल. 

सर्वेक्षणानुसार, 80 टक्के अमेरिकन लोक त्यांचा चेहरा धुताना हमखास एक चूक करतात. निरोगी शरीरासोबत चेहरा स्वच्छ करणे गरजेचं आहे. 

चेहरा धुणं गरजेचं आहे?

हो चेहऱ्याची निसर्गिक पातळी राखण्यासाठी चेहरा रोज नीट धुणे खूप गरजेचं आहे. दररोज तुमचा चेहरा उष्णता, आर्द्रता आणि घाण यांच्या संपर्कात येतो. यामुळे त्वचा निस्तेज दिसायला लागते. जर आपण चेहरा स्वच्छ केला नाही तर मुरुम होतात. शिवाय त्वचेशी संबंधिक समस्यादेखील उद्भवू शकते.  त्यामुळे फेस क्लिन्जिंग करणं खूप गरजेचं आहे.

दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा?

तज्ज्ञांच्या मते दिवसातून दोन तरी नियमित चेहरा धुवा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. त्या व्यतिरिक्त कुठून बाहेर जाऊन आल्यास चेहरा धुणं चांगलं असतं. मात्र एक लक्षात ठेवा प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते त्याचा समस्याही वेगळ्या असतात. अशात तुमच्या तज्ज्ञांशी बोलून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )