वजन कमी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त तो चहा असा असला पाहिजे

Herbal teas for weight loss : आज आम्ही तुम्हाला अशाच 4 हर्बल टी बद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं वजन कमी केलं जाऊ शकतं.

Updated: Sep 15, 2022, 06:26 PM IST
वजन कमी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त तो चहा असा असला पाहिजे title=

मुंबई : वजन कमी करायचंय पण काय केल्याने वजन कमी होईल? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना मिळत नाही. व्यायाम न करता वजन कमी कसं करता येईल? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पदार्थांचं सेवन करतात.  काहीवेळा या पदार्थांचा काहीही परिणाम दिसून येत नाही. तुम्ही कधी विचार केलाय का, चहा पिऊन देखील वजन कमी केलं जाऊ शकतं? आज आम्ही तुम्हाला अशाच 4 हर्बल टी बद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं वजन कमी केलं जाऊ शकतं (Herbal teas for weight loss).

अश्वगंधाचा चहा (Ashwagandha Tea)

अश्वगंधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतं, ज्यामध्ये अँटी -इंफ्लेमेटरी गुण देखील असतात. या गुणांमुळे मुक्त कणांपासून होणारं नुकसान थांबवलं जाऊ शकतं आणि यामुळे तुमच्या ब्लड शुगरची लेव्हल देखील कमी करता येते. अश्वगंधामुळे तुमच्या शरीराचं तापमान वाढतं आणि कॅलरी बर्न करण्यासाठी मदद केली जाऊ शकते. याशिवाय यामुळे शरीरातल्या मेटाबोलिक स्पीडची  देखील वाढ होऊन तुमचं वजन कमी करण्यास मदत मिळते.

गुळ आणि ओवाचा चहा (Jaggery Ajwain Tea)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. ओव्यामध्ये मेटाबोलिक आणि फॅट बर्निंगची गती वाढवण्याचे गुण असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी याची मदत होते. त्यासोबतच, गुळामुळे शरीराची ऊर्जा वाढते आणि होर्मोनल हेल्थला संतूलित ठेऊन वजन कमी करण्यास मदत होते.

अजमोदाचा चहा (Parsley Tea)

अजमोदाचा चहा हा वजन कमी करण्यासाठी अतंत्य उपयोगी ठरतो. अजमोदमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. यामध्ये असलेल्या यूजेनॉलमुळे ब्लड शुगर लेवल संतुलित ठेवतं आणि डायबिटीज पेशंटचं वजन कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो. 

हळद आणि काळी-मिरीचा चहा (Turmeric Black Pepper Tea)

हळद आणि काळी-मिरीचा चहा बनवताना त्यामध्ये मधाचा समावेश करावा. या चहामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. हा चहा पिल्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबोलिकचं प्रमाण वाढेल आणि यामुळे तुमचं वजन कमी होईल.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)