मुंबई : हिवाळी सुरु झाला आहे. अनेक भागात थंडी वाढली आहे. त्यामुळे वातावरण बदललं की, अनेकांची प्रकृती बिघडते. हिवाळ्यात वायुप्रदूषणामुळे लोकांना खोकल्याची समस्या अधिक असते. तुम्हाला देखील खोकला किंवा सर्दी झाली असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेऊ शकतात.
तुळशीची पाने : तुम्हाला फक्त तुळशीची काही पाने धुवून रोज सकाळी चघळली तर देखील घशाची समस्या तर दूर होईलच, पण पोटही ठीक होईल.
आयुर्वेदिक चहा : तुम्ही तुळस, आले, काळी मिरी, दालचिनी पाण्यात भिजवा आणि सकाळी आयुर्वेदिक चहा तयार करा. जर तुम्ही त्यात दूध मिसळले नाही तर हा आयुर्वेदिक उपचार अधिक प्रभावी ठरू शकतो.
आवळा : तुम्ही आवळ्याचा देखील वापर करु शकता. हे एक अँटीव्हायरल औषध आहे, ज्याचा वापर सर्दी आणि खोकल्यासाठी करता येतो. रोज सेवन करुन त्यानंतर सुमारे एक तास झोप घ्या.