Back Pain In Morning: झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? 'या' उपायांमुळे होईल क्षणात सुटका

Back Pain In Morning: सकाळ सकाळी जेव्हा झोपेतून तुमचा डोळा उघडतो त्यावेळी सवयीनं तुम्ही शरीराला एक जबरदस्त streatch देता. अनेकांना यावेळी पाठदुखी सतावते.... असं का? एकदा वाचाच. 

Updated: Nov 17, 2022, 07:39 AM IST
Back Pain In Morning: झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? 'या' उपायांमुळे होईल क्षणात सुटका  title=
Back Pain In Morning reasons and remedies

Back Pain In Morning: घड्याळाच्या काट्यावर जगणं काय असतं, हे आता जास्त प्रत्ययकारीरित्या पाहायला मिळत आहे. कारण, आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती घड्याळ्याच्याच काट्यावर धावत आहे. कुणी नोकरीसाठी (Job) तर कुणी कशासाठी. अशा या धकाधकीच्या आयुष्यात असेही काही प्रसंग येतात ज्यावेळी आपलं शरीरच उत्तर देऊ लागतं. कारण, आपण काही यंत्रमानव नाही. तासन् तास एकाच ठिकाणी बसून राहणं, किंवा एकाच ठिकाणी उभं राहणं या आणि अशा अनेक कारणांमुळे हल्ली बऱ्याचजणांना पाठ आणि कंबरदुखीचा (Back, lower back Pain ) त्रास सतावू लागतो. यामध्ये वाढतं वय हीसुद्धा एक काळजी करण्याजोगी बाब असते. तुम्हालाही हा त्रास सतावतोय का? हो? (Back Pain In Morning reasons and remedies)

सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर पाठ आणि कंबर प्रचंड दुखते अशी तक्रार करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर यामागची कारणं सर्वप्रथम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण, त्यानुसार योग्य उपाय घेऊन तुम्ही या तक्रारी दूर करु शकता. 

चुकीच्या पद्धतीनं कुशीवर झोपल्यास... 
चुकीच्या पद्धतीनं एकाच कुशीवर अर्थात एकाच बाजुला झोपल्यास पाठ आणि कंबर दुखू लागते. तुम्हालाही ही सवय असेल, तर आताच ती बदला. रात्रीच्या वेळी झोपलेलं असताना किमान 4 ते 5 वेळा शरीराची बाजू बदला. यामुळं कंबरदुखीपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. (Sleeping on one side)

ऑस्‍टि‍योपोरोस‍िस (osteoporosis)
कंबरेच्या सततच्या दुखण्यामुळे ऑस्‍टि‍योपोरोस‍िससुद्धा होऊ शकतो. ही एक अशी व्याधी आहे, ज्यामध्ये हाडं कमकुवत होतात. ऑस्‍टि‍योपोरोस‍िसचा त्रास तुम्हालाही असल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा. 

हेसुद्धा वाचा : तुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर!

स्लिप डिस्क (sleep disk) 
स्लिप डिस्कमध्ये चुकीच्या पद्धतीनं हालचाल झाल्यासही सकाळ सकाळी कंबरदुखीचा त्रास सतावू शकतो. तुम्हीही या समस्येशी झगडत असाल तर, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

कॅल्शियमची कमतरता (calcium deficiency)
शरीरात काही पोषक घटकांची कमतरता झाल्याससुद्धा अनेकांनाच कंबरदुखीचा त्रास सतावू लागतो. त्यातही कॅल्शियमची कमतरता अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. 

कंबरदुखी आणि पाठदुखीवर उपाय काय? (Remedies on back pain)

कमकुवत मांसपेशींमुळे तुम्हाला कंबर अथवा पाठदुखीचा त्रास सतावत असल्यास काही सोप्या व्यायाम प्रकारांच्या मदतीनं तुम्ही या त्रासाला दूर ठेवू शकता. पण, एखादा आजार किंवा शारीरिक व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच असे निर्णय घ्यावेत. योगासनांमधील काही आसनं या दुखण्यांवर रामबाण उपाय ठरतात. यामध्ये पवनमुक्तासन, बंधासन, भुजंगासन किंवा नौकासन यांचा समावेश आहे. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )