Belly Fat: 'या' 5 स्टेप्स करा फॉलो; वाढलेल्या पोटाचा घेर नक्की होईल कमी!

How to reduce belly fat : तुमचं बेली फॅट कमी (burn belly fat) होत नसेल तर आम्ही आज तुम्हाला उत्तम पर्याय सांगणार आहोत. यासाठी आम्ही तुम्हाला 5 स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही वाढलेलं पोट कमी करू शकणार आहात.

Updated: Mar 23, 2023, 06:45 PM IST
Belly Fat: 'या' 5 स्टेप्स करा फॉलो; वाढलेल्या पोटाचा घेर नक्की होईल कमी!

How to reduce belly fat: आजकाल अनेकांमध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट (belly fat) म्हणजेच पोटाच्या चरबीची समस्या दिसून येते. पोटाचा हा वाढलेला घेर कमी व्हावा यासाठी अनेकजण विविध गोष्टींचा अवलंब करतात. यामध्ये जीम (Gym), किटो डाएट (Diet) तसंच एक्सरसाईज यांचा समावेश आहे. मात्र अनेकदा काही कारणांमुळे आपण या गोष्टी फॉलो करत नाही, किंवा ते फॉलो करण्यासाठी कंटाळा करतात. 

जर तुमच्यासोबतही असं घडत असेल आणि तुमचं बेली फॅट कमी (burn belly fat) होत नसेल तर आम्ही आज तुम्हाला उत्तम पर्याय सांगणार आहोत. यासाठी आम्ही तुम्हाला 5 स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही वाढलेलं पोट कमी करू शकणार आहात.

पाणी पिण्याची योग्य मात्रा

तुम्हाला माहितीये का की, तुमचं वजन कमी करण्यासाठी पाणी खूप मदत करतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दर दिवसाला 2-3 लीटर पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं शिवाय लीव्हर देखील योग्य काम करतं. यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.

या सवयींवर लक्ष द्या

आपल्या अशा काही सवयी असतात ज्यामुळे तुमचं वनज वाढू लागतं. जर तुम्ही या सवयी बदलल्या तर वजन कमी होण्यास मदत होते. या सवयी म्हणजे, खाल्ल्यानंतर चहा पिणं, थंड शीतपेयांचं सेवन करणं इत्यादी. या गोष्टींमुळे तुमची पचनक्रिया हळू होते आणि वजन वाढतं. त्यामुळे या सवयींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

हिरव्या भाज्या खाव्यात

हिरव्या भाज्यांमध्ये पोषक घटक असून ते शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये असणार फायबर पचनक्रिया योग्य पद्धतीने सुरु ठेवण्यास मदत करतात.

ही काम केली पाहिजेत

सध्या कामाच्या ठिकाणी लोकांची बैठी जीवनशैली वाढली आहे. त्यामुळे शारीरिक हालचालींचं प्रमाण कमी झालं. यामुळे वजन वाढू लागतं. यासाठीच तुमच्या जीवनशैलीत एक्सरसाईज, खेळ तसंच जॉगिंगचा समावेश असला पाहिजे. यामुळे शरीरातील अतिरिक्त ऊर्जेचे फॅटमध्ये रूपांतर होणार नाही.