Bisleri Vs Bilseri Water Bottle: भारत हा जुगाडू म्हणजेच काहीही तडजोड करुन वेळ मारुन नेणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र या जुगाडू विचारसरणीच्या नादात अनेकदा खऱ्या गोष्टींचं नामसाधर्म्य असणाऱ्या ड्युप्लिकेट गोष्टीही तयार केल्या जातात. अनेकदा तुम्हीही नामवंत ब्रॅण्डचे ड्युप्लिकेट ब्रॅण्ड बाजारात पाहिले असतील. मात्र ही अशी चोरी पकडली गेली की काय होतं याचा प्रयत्न नुकताच उत्तर प्रदेशमधील बागत येथे आला.
उत्तर प्रदेशमधील बागपतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर एका नामवंत कंपनीच्या नावाला साधर्म्य असणाऱ्या कंपनीची बाटली मिनरल वॉटरची बाटली म्हणून ठेवण्यात आली. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हायातील खाद्य विभागात एकच गोंधळ उडाला. खऱ्या नावात थोडा फेरफार करुन अगदी हुबेहुब ब्रॅण्डेड पाणी वाटावं अशा या बाटल्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांना धक्काच बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी खाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून याबद्दलची माहिती दिली.
थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच आक्षेप नोंदवल्यानंतर अन्न आणि प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'बिसलेरी' या नामवंत ब्रॅण्डच्या नावाशी मिळत्या जुळत्या 'बिसल्लेरी', 'बिसलारी', 'बिलसेरी' या सारख्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या असलेल्या दुकानांवर तसेच गोदामांवर छापेमारीला सुरुवात केली. या छापेमारीमध्ये मोठ्याप्रमाणात बनावट मिनरल वॉटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या पुढाकारानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी तातडीने या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक खाद्य सुरक्षा आयुक्त मनवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील टीमने छापेमारी केली. त्यामध्ये बनावट नावाने चालणाऱ्या कंपनीतील बाटल्या जप्त करण्यात आल्या.
'बिसलेरी' ब्रॅण्डच्या नावाशी मिळत्या जुळत्या 'बिसल्लेरी', 'बिसलारी', 'बिलसेरी' या सारख्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या दुकानादारांवर कारवाई करण्यात आली. तसेच मोठ्याप्रमाणात या नकली ब्रॅण्डच्या बाटल्या जाप्त करण्यात आल्या. याच कारवाईदरम्यान बागपतमधील गौरीपूर जवाहर नगर गावामध्ये कोणताही परवाना न घेता एका घरात पाण्याच्या बाटल्या भरुन या खोट्या ब्रॅण्डखाली विकण्याचा उद्योग चालू असल्याचा भांडाफोडही झाला. या कारखान्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईचे व्हिडीओही समोर आलेत...
बागपत
जिलाधिकारी को पकड़ा दिया फर्जी पानी की बोतल
बागपत में तैयार होती थी बिसल्लेरी, बिसलारी, बिलसेरी के नाम से नकली पानी की बोतलें
जिलाधिकारी के आदेश पर हुई कार्रवाई pic.twitter.com/rFd3B8XgAy
— Avinash Tiwari (@TaviJournalist) October 6, 2024
या कारखान्यांना बाटल्या पुरवणाऱ्यांविरोधातही कारवाई झाल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईत जप्त केलेल्या बाटल्या जाळून नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर त्या गाडून टाकण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
PHI
0/0(0 ov)
|
VS |
INA
|
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.