कॅन्सर होण्याआधी शरीर देते पूर्वसूचना; चुकूनही दुर्लक्ष करू नका अन्यथा महागात पडेल

Signs Before Cancer: कोणताही आजार होण्याआधी आपले शरीर आपल्याला त्याची पूर्वकल्पना देत असते. मात्र, वेळेत आपल्याला शरिराचे हे संकेत समजले पाहिजेत 

मानसी क्षीरसागर | Updated: May 31, 2023, 07:00 PM IST
कॅन्सर होण्याआधी शरीर देते पूर्वसूचना; चुकूनही दुर्लक्ष करू नका अन्यथा महागात पडेल title=
Body Gives These Sign Before Getting Cancer know the details

Body Gives These Signals Before Getting Cancer: आजारी पडण्याआधी आपले शरीर आपल्याला संकेत देत असतात. (Health Tips) मात्र, अनेकदा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करत असतो. पण तुमची हिच सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. तुमच्या शरिरात होणारे बदल हेदेखील आजाराचे संकेत असतात. त्यामुळं या संकेताकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे संकेत कॅन्सरसारख्या (Cancer) दुर्धर आजाराचेही असून शकतात. कॅन्सरवर वेळीच योग्य उपचार होणे गरजेचे आहे. पण वेळीच या आजाराचे निदान होणे आवश्यक आहे. म्हणूनच या संकेतांकडे दुर्लक्ष करणे महागात पडून शकते. कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच शरिर आपल्याला काय संकेत देते, हे जाणून घेऊया. (Signs Before Cancer)

कॅन्सर होण्याआधी शरिर देते हे संकेत 

नेहमी थकवा वाटणे

पुरेशी झोप आणि योग्य आहार घेऊनही तुम्हाला नेहमी थकवा येतो का?, असं असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण, थकवा येणे हे नेहमीच तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्याचे संकेत देते. त्यामुळं सतत थकवा जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

वाचाः वजन झपाट्याने वाढलंय?; 'या' पाच व्यायाम पद्धती वापरुन राहा फिट

अंगदुखी

बऱ्याच कालावधीपासून तुम्ही अंगदुखीने त्रस्त आहात. तसंच, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण विनाकारण होणारी अंगदुखी हे एखाद्या अजाराचे संकेत असू शकतात. अंगदुखी आणि अस्वस्थता वाटत असेल तर लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क करा. 

अचानक वजन कमी होणे

व्यायाम आणि डाएटमध्ये न बदल करता ही तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. कारण कॅन्सर असल्यास शरिराचे वजन झपाट्याने कमी होते. तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा व त्यांचा सल्ला घ्या.

त्वचेत बदल होतो

त्वचेत बदल होणे हे कँन्सरचा सुरुवातीचे लक्षण आहे. यावेळी व्यक्तीच्या त्वचेचा रंग फिकट होतो. तसंच, त्वचेवर खाज येणे, रक्त येणे तसंच बारीक पुरळ येणे यासरख्या समस्या होतात. त्यामुळं तुम्हालाही त्वचेसंबंधित काही समस्या असेल तर दुर्लक्ष करु नका. 

टीप :- हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.