breast cancer 1 million lives in Marathi: स्तनाचा कर्करोग हा आता कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. आता तरुणींमध्येही स्तनाचा कर्करोग दिसून येत आहे. तीस आणि चाळीशीच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान वाढत असल्याते निर्दशनात आले आहे. रोगाबाबत वाढती जागरुकता हे देखील याचे कारण मानले जाऊ शकते. परंतु अनुवांशिक, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक देखील यामागे कारणे असू शकतात. त्यामुळे जगभरात ब्रेस्ट कॅन्सरची चिन्हे आणि लक्षणे यावर सातत्याने संशोधन केले जात आहे. आतातर स्तनातील गाठी व्यतिरिक्त इतर काही चिन्हे देखील समोर आली आहे, ज्याद्वारे स्तनाचा कर्करोग शोधला जाऊ शकतो. असे असताना या आजारामुळे 2040 पर्यंत दरवर्षी 1 लाखांहून महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. लॅन्सेटच्या नव्या अहवालातून ही बाबसमोर आली आहे. अहवालात म्हटले की 5 वर्ष ते 2020 च्या अखेरीस सुमारे 78 लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्या वर्षी सुमारे 6,85,000 महिलांचा या आजाराने मृत्यू झाला.
जागतिक स्तरावरील अंदाज, स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 2020 मध्ये 2.3 दशलक्ष वरून 2040 पर्यंत 3 दशलक्षांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्याचा परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होईल. 2040 पर्यंत, दरवर्षी 1 दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याती शक्यता आहे, असा इशारा लॅन्सेट अहवालात दिला असून स्तनाच्या कर्करोगामुळे उद्भवणारी तीव्र असमानता आणि लक्षणे, नैराश्य आणि आर्थिक भार याकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान स्तनाच्या कर्करोगामध्ये, अशी काही लक्षणे आहेत जी स्तनामध्ये गाठ निर्माण होण्यापूर्वी दिसतात ज्याद्वारे आपण त्यांना ओळखू शकतो. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरने केलेल्या अभ्यासात 1,000 हून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले गेले आणि 93% लोकांना स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण म्हणून गाठ असल्याचे आढळले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी निम्म्या व्यक्तींमध्ये कमतरतेव्यतिरिक्त सामान्य लक्षणे आढळून आली. स्तनाच्या कर्करोगाची सुरुवात केवळ स्तनामध्ये गाठ निर्माण होण्याने होत नाही.
1. स्तनाग्र (निप्पल) मागच्या बाजून मोडलेले, उलटे किंवा खालच्या दिशेने निर्देशित करणे
2. स्तन आकुंचन होणे
3. स्तनाच्या भागामध्ये संवेदना कमी होणे
4. स्तनाची त्वचा मंद होणे, जाड होणे
5.. स्तनाग्र (निपल) मधून स्त्राव होणे
जगभरात 2016 ते 2020 या पाच वर्षांत
स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 78 लाख आहे
मृत्यू 6.85
12 वर्षांच्या महिलेला 75 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी स्तनाच्या कर्करोगाचे निदान
2020-23 लाख रुग्ण
2040-30 लाख रुग्ण, 10 लाख मृत्यू (अंदाज)
कमी आणि मध्यम उत्पादन असलेल्या देशांना मोठा फटका बसतो
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.