योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

योनीमध्ये ओलावा नसल्यामुळे संभोगात अडथळे येऊ शकतात किंवा संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. योनिमार्गातील कोरडेपणा हे हार्मोनल असंतुलन किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.

सुरभि जगदीश | Updated: Jun 14, 2024, 01:58 PM IST
योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात title=

योनिमार्गातील कोरडेपणा स्त्रीसाठी केवळ ही निराशाजनक स्थिती आणि अस्वस्थता निर्माण करत नाही तर त्यामुळे वंधत्वासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. जेव्हा योनीमार्गात पुरेसे लुब्रिकेशन होत नाही, तेव्हा स्त्रियांना योनिमार्गाच्या कोरडेपणाचा त्रास होऊ शकतो, जो सामान्यतः वयस्कर स्त्रियांमध्ये दिसून येतो, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आढळून येते. परंतु, हल्ली मोठ्या संख्येने तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त आहेत ज्यामुळे त्यांच्या प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो. योनीमार्गाच्या कोरडेपणाचे वेळीच व्यवस्थापन केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.

योनीमध्ये ओलावा नसल्यामुळे संभोगात अडथळे येऊ शकतात किंवा संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. योनिमार्गातील कोरडेपणा हे हार्मोनल असंतुलन किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. जेव्हा योनीमार्ग कोरडा असतो अशावेळी शुक्राणू गर्भाधान प्रक्रियेसाठी गर्भाशय मुख आणि फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे इतर ज्ञात प्रजनन समस्या नसतानाही यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. यशस्वीपणे गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी योग्य लुब्रिकेशन तंत्राद्वारे योनिमार्गातील कोरडेपणा दूर करणे किंवा कोणतीही मूळ कारणे ओळखण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे अशी माहिती पुण्यातील सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रजनन विकार तज्ज्ञ डॉ. नमिता भालेराव यांनी दिलीये.

तर पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता पार्टे यांनी म्हटलंय की, योनिमार्गात कोरडेपणा अनेक स्त्रियांना प्रभावित करते जेव्हा योनीची नैसर्गिक लुब्रिकेशन पद्धत मुख्यतः रजोनिवृत्ती दरम्यान योग्यरित्या कार्य करत नाही. योनामार्गातील कोरडेपणाची समस्या हार्मोनल बदल, मधुमेह, लैंगिक उत्तेजना कमी होणे, रासायनिक उत्पादनांची वापर, काही ठराविक औषधे आणि तणाव यासारख्या कारणांमुळे देखील उद्भवू शकते. योनीमार्गातील कोरडेपणामुळे संभोग दरम्यान अस्वस्थता आणि वेदना देखील होऊ शकतात.   योनीमार्गात कोरडेपणा हे वंध्यत्वाचे थेट कारण नसले तरी, अधिक घर्षणामुळे तुम्हाला लैंगिक क्रियांचा आनंद घेणं अशक्य होऊ शकतं. त्यामुळे स्त्रियांसाठी गर्भधारणा आव्हानात्मक ठरु शकते. 

डॉ. भालेराव पुढे म्हणाल्या की, योनिमार्गाच्या कोरडेपणाचा दूर करण्यासाठी आणि वेदना व्यवस्थापित करण्यासाठी योनिमार्गात लुब्रिकेशनचा वापर करावा . येनीमार्गातीस ओलाव टिकविण्यासाठी हायड्रेटेड रहा कारण दीर्घकाळ कोरडेपणा निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतो.खाज सुटणे आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेल वापरा आणि डाऊचिंग आणि रसायनांचा समावेश असलेल्या उत्पादनांचा वापर टाळा. या टिप्स योनिमार्गाच्या कोरडेपणावर मात करण्यास, सेक्सचा आनंद घेण्यास आणि गर्भधारणेचे स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच मदत करतील.