कोथिंंबीरच्या 'या' मास्कने आटोक्यात ठेवा उन्हाळ्यातील अनेक त्वचा समस्या

सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. 

Updated: Mar 23, 2018, 06:28 PM IST
कोथिंंबीरच्या 'या' मास्कने आटोक्यात ठेवा उन्हाळ्यातील अनेक त्वचा समस्या   title=

मुंबई : सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. तुम्हांला उन्हात बाहेर जावं लागत असेल तर सहाजिकच तुम्हांला सनबर्न, टॅनिंगचा त्रास होऊ शकतो. तुमची त्वचा संवेदनशील किंवा तेलकट असेल तर सहाजिकच तुम्हांला उन्हाळ्याच्या दिवसात अ‍ॅक्ने, पिंपल्सचा त्रास अधिक होऊ शकतो. सनबर्न किंवा टॅनिंगमुळे तुमची त्वचा काळवंडलेली असेल तर चेहर्‍याला पुन्हा उजळण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरू शकतात. म्हणूनच  महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सआधी काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांचा नक्की विचार करा.  

कोथिंबीरचा फेसमास्क  

उन्हाळ्याच्या दिवसात चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते. उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर मास्क अनेक समस्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी फयदेशीर ठरते. मग पहा घरच्या घरी कसा बनवाल कोथिंबीरचा फेसपॅक 

कोथिंबीरच्या फेसमास्कसाठी आवश्यक साहित्य - 

कोथिंबीरीचं पानं,
बेसन, 
मध 

कसा बनवाल फेसपॅक ? 

कोथिंबीरीची पानं स्वच्छ धुवून घ्या. त्यनंतर या पानांची पेस्ट करा. तयार पेस्टमध्ये चमचाभर बेसन आणि मध मिसळा. हा मास्क अति पातळ किंवा जाड ठेवू नका. चेहर्‍यावर समान थर पसरून सुमारे 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावा. फेस मास्क चेहर्‍याला लावताना डोळ्यांपासून थोडे अंतर ठेवा. 

आठवड्यातून दोन वेळेस हा फेसपॅक नियमित चेहर्‍याला लावल्यास सनबर्नचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होईल. 

कसा ठरतो फायदेशीर ? 

कोथिंबीर चेहर्‍यावरील बॅक्टेरियांचा संसर्ग नष्ट करण्यास मदत करतात तर मधामुळे त्वचा स्वच्छ होते, त्वचेची कांती खुलण्यास मदत होते. परिणामी सनबर्नचा त्रास टाळण्यास मदत होते. 

अन्य फायदेशीर घटक कोणते ? 

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला होणारी हानी आटोक्यात ठेवण्यासाठी बेसन आणि मधासोबत कोरफडाचाही समावेश करता येऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी -1, बी -5, बी -6 आणि बी 12, मिनरल घटक मुबलक प्रमाणात आढळतात.