तुम्हालाही Corona होऊन गेलाय का? या बातमीकडे दुर्लक्ष करु नका

कोरोना दूर गेलेला असला तरीही तो त्याच्या खुणा मात्र मागे ठेवून गेला आहे हे नाकारता येत नाही.   

Updated: Feb 17, 2022, 03:51 PM IST
तुम्हालाही  Corona होऊन गेलाय का? या बातमीकडे दुर्लक्ष करु नका  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जवळपास 2 वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरस (Coronavirus)चा विळखा पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण झाल्यापासून अनेक नागरिकांमध्ये काही शारीरिक बदल झाले. इतक्यावरच न थांबता याचे आणखीही काही परिणाम दिसून आले, ज्यामुळं आता कोरोना होऊन गेलेल्यांनी या बदलांकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज वाटत आहे. 

मानसिक आरोग्याची काळजी घ्या 
एका अहवालातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार कोरोनातून सावरलेल्या अनेकांनाच मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण, कोरोनातून सावरलेल्या अनेकांनाच मानसिक आरोग्याचीही काळजी सतावू लागली आहे. 

या महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जगभरात 40 करोड़ 30 लाख आणि अमेरिकेमध्ये सात करोड़ 70 लाखांहून अधिकांना कोरोनानं गाठलं. 

दरम्यानच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित  1,48,00,000 प्रकरणं चिंतेत भर टाकून गेली. 

निरीक्षणातून समोर आलेल्या वृत्तानुसार कोविड संक्रमितांना नैराश्याचा धोका 39 टक्के जास्त आहे. तर 35 टक्के कोविड बाधितांमध्ये भीती आणि सततची चिंता अशा समस्या उदभवल्या आहेत. 

कोरोनातून सावरलेल्या 41 टक्के रुग्णांना निद्रानाशाचीही समस्या उदभवली आहे. ज्यामुळे कोरोना दूर गेलेला असला तरीही तो त्याच्या खुणा मात्र मागे ठेवून गेला आहे हे नाकारता येत नाही. 

महत्त्वाचा मुद्दा असा, की कोणालाही अशा समस्या असल्यास त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा.