कॅन्सरपासून काकडी वाचवणार, हे आहेत काकडीचे गुणकारी फायदे

उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी शरिरात पाण्याची जास्त आवश्यकता असते. 

Dakshata Thasale Updated: Mar 13, 2018, 01:39 PM IST
कॅन्सरपासून काकडी वाचवणार, हे आहेत काकडीचे गुणकारी फायदे

मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी शरिरात पाण्याची जास्त आवश्यकता असते. 

पाण्याची कमतरा भरून काढण्यासाठी या दिवसांत भरपूर पाणी प्यावे. तसेच फळ आणि भाज्या देखील खाव्यात ज्यातून शरिरातील पाण्याची पातळी पुरेशा प्रमाणात राहते. उन्हाळ्यात काकडीला अधिक पसंती असते. वर्षभर काकडी खाल्ली जाते. मात्र उन्हाळ्यात याचं प्रमाण वाढतं. 

काकडी अतिशय गुणकारी 

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरिरात कायम थंड वातावरण राहते. त्याचप्रमाणे काकडीत विटामिन्स भरभरून असतात जे आपल्या शरिराला देखील अधिक महत्वाचे असतात. काकडी फक्त खाण्यासाठीच नाही तर आपली सुंदरता वाढवण्यासाठी देखील याचा फायदा होतो. 

कॅन्सरपासून काकडी वाचवते 

काकडीमध्ये असलेलं प्रोटीन आपल्या शरिरात कॅन्सरपासून लढण्याची क्षमता देते. कॅन्सरच्या ट्यूमरचा विकास होण्यापासून काकडी रोखत असते. त्यामुळे काकडीला कॅन्सर विरोधी फळ म्हटलं जातं.