डाबर इंडियाकडून योगगुरू बाबा रामदेव यांचे आभार

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने सर्वात मोठं आव्हान डाबर इंडियाला दिलं असं म्हटलं जातं. पण डाबरचे

Updated: Nov 28, 2018, 08:56 PM IST
डाबर इंडियाकडून योगगुरू बाबा रामदेव यांचे आभार

मुंबई : बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने सर्वात मोठं आव्हान डाबर इंडियाला दिलं असं म्हटलं जातं. पण डाबरचे इंडियातील बिझनेस सीईओ मोहित मल्होत्रा म्हणतात, बाबा रामदेव यांच्यामुळे डाबर इंडियाला फायदा झाला आहे.मोहित मल्होत्राने इकोनॅामिक टाईम्सशी बोलताना सांगितलंय, 'पतंजलीपासून कंपनीला फायदा झाला आहे. कारण, पतंजलीमुळे आयुर्वेदाविषयीची जागरुकता वाढली आहे. 

डाबर सर्वात मोठी कंपनी

यामुळे सर्वात जास्त फायदा होणारी कंपनी डाबर ठरु शकेल. त्याचबरोबर डाबर सर्वात मोठी कंपनी आहे. तसेच त्यांचा वारसा लोकांच्या मनात बसला आहे.'

मल्होत्रा म्हणाले, देशात आयुर्वेदीक वस्तूंच्या वाढत्या मागणीसाठी आम्ही बाबा रामदेव यांचे खूप आभारी आहोत. मला वाटते की आम्ही बाबाजींचे आभार मानले पाहिजेत. कारण सर्व नैसर्गिक क्षेत्रांमध्ये विकास दर अधिक आहे. 

रामदेव बाबा यांनी सांगितले की डेन्टल केअरमध्ये देखील नैसर्गिक वस्तूंच्या प्रॉडक्ट ३५ टक्के दराने वाढ झाली आहे. जो पारंपरिक विभागापेक्षा दुप्पट आहे. याचाच फायदा डाबरलाही मिळणार आहे. कारण, डाबर आयुर्वेदीक सर्वात जुना ब्रॅंड आहे.   

पतंजलीकडून आव्हान 

पतंजलीच्या आव्हानांचा संदर्भात ते म्हणाले, 'हे खरं आहे की, सुरुवातीला पतंजलीने धक्का दिला होता. बाजारात मधाच्या उत्पादनात डाबर १० टक्क्याने घसरलं होतं. परंतू डाबरने गमावलेल्या शेअर्सपेक्षा अधिक शेअर्स आता मिळवले आहेत. 

चवनप्राश हा सर्वात जास्त प्रभावित करणारं दुसरं उत्पादन होते. आताचे आकडे दर्शवतात की, ग्राहक पुन्हा डाबरच्या जवळ परतत आहेत. पहिल्यांदाच पतंजलीच्या विक्रीत ५ वर्षात घसरण झाली आहे. येणाऱ्या दिवसात कंपनी डाबर लाल तेल आणि पुदीन हरा कफ अॅण्ड कोल्ड यामध्ये जास्त लक्ष देणार आहे.