Skills : तुमचा विकास हा तुमच्या कौशल्यांच्या आधारावर ठरतो. हल्लीच्या काळात सगळ्याच गोष्टींचे ज्ञान असणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी फक्त शिकण्याची इच्छा हवी. तुम्हाला सतत शिकायची इच्छा असल्यास तुम्ही नवीन कौशल्य आरामात शिकु शकता. आज आम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारची कौशल्य 2022 मध्ये असली पाहिजेत याविषयी सांगणार आहोत... (Do you have these skills then you too can earn lakhs of rupees nz)
1. ब्लॉगिंग (Blogging)
सध्या लोक मोठ्या प्रमाणात ब्लाॅग वाचतात. ब्लॉगिंगमुळे आपण नवनवीन माहिती एकाच वेळेस अनेकांपर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आपल्या ज्ञानात ही भर पडते. जर तुम्ही ब्लॉग करू शकत असाल तुम्ही त्यातून उत्पन्न (Income Source) तयार करु शकता. हे कौशल्य तुमच्यात असल्यास त्याचा फायदा देखील तुम्हाला होता. तुम्हाला पुर्ण वेळ नोकरी करता करता साइडला ब्लॉगिंग सुद्धा करता येऊ शकते.
2. सार्वजनिक संवाद (Public communication)
संवाद साधताना अनेकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातले प्रमुख कारण त्यांच्यात आत्मविश्वास नसतो. काहींना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती असते यालाच ग्लोसोफोबिया म्हणतात. जर तुम्ही सार्वजनिक संवाद हे कौशल्य विकसित केल्यास तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा भविष्यात ही होईल. या कौशल्यातून इनकम जनरेट होण्याची शक्यता अधिक असते.
3. व्हिडिओ उत्पादन (Video production)
सध्या बाजारात व्हिडिओ उत्पादन करणाऱ्यांना चांगलेच महत्त्व आहे. हे कौशल्य विकसित करण्याआधी तुम्हाला पूर्व-निर्मिती, चित्रीकरण आणि संपादन या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. हल्ली लोकांना व्हिडिओ पाहायला आवडतात यामुळे तुम्ही हे नवीन कौशल्य शिकू शकता. येत्या काही वर्षांत या कौशल्याला बाजारात चांगलीच मागणी आहे.
4. डिजिटल विपणन (Digital Marketing)
तुमच्याजवळ कितीही चांगले प्रोडक्ट असले तरी तुम्ही त्याचे मार्केटिंग कसं करता त्यावर सगळं अवलबूंन आहे. डिजिटल जग सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इथे तुम्ही जे उत्पादन बाजारात आणता त्याची दखल जग घेत असते. म्हणून डिजिटल विपणन हे कौशल्य शिकून घेतल्यास त्याचा तुम्हाला पुरेपुर वापर करता येईल.
5. SEO आणि SEM मार्केटिंग (SEO and SEM Marketing)
SEO आणि SEM मार्केटिंग हे कौशल्य फक्त शोध इंजिन ऑप्टिमायझेशन आणि मार्केटिंगशी संबंधित आहे. 93 टक्के ऑनलाईन अनुभव सर्च इंजिनपासून सुरू होतात. या कौशल्याची मागणी मोठमोठ्या कंपनीमध्ये असते. तुम्ही हे कौशल्य आत्मसात केल्यास याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)