Kia Syros Booking : Kia Syros ही 19 डिसेंबर रोजी भारतात लॉन्च झाली आहे. तर त्याची बूकिंमग ही आता सुरु झाली आहे. या एसयूव्ही डिफेंडरसारखी डिझाइनची एक झलक देते. ज्यामुळे ग्राहक त्याला घेऊन खूप एक्सायटेड होतात. सीरोसला बूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही एकतर किआच्या अधिकृत वेबसाईटवरून ही गाडी बूक करु शकतात किंवा कोणत्या किआ डीलरशिपवर जाऊ शकतात. एसयूव्हीला अनवील केल्यानंतर आता जाऊन त्याची बूकिंग सुरु झाली आहे आणि त्याला चांगली प्रतिक्रिया मिळण्याची आशा आहे.
किआ सीरोस सोनेट पेक्षा मोठी आणि सेल्टोसपेक्षा छोटी आहे. या कारची एक वेगळीच डिझाइन आहे. या कारचा बाहेरचा भाग हा चंकी ठेवला आहे, तर इंटीरियरमध्ये ग्राहकांना एक स्टायलिश आणि क्रिस्प डिझाइन पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे एक बॉक्सी फील मिळतो. आता किआ इंडियाच्या एका वेबसाइटवर जाऊन 'प्री-बुक' करण्याचा ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे देखील ही कार बूक करू शकतात. एकदा तुम्ही हा डीटेलमध्ये फॉर्म भरला आणि टोकन अमाउंट जमा करतात. त्यानंतर तुमची किआ सीरोस बूक होते. किआ सीरोस बूकिंगसाठी टोकन म्हणून फक्त 25000 रुपये आहे.
Syros मॉडल लाइनअपमध्ये सहा ट्रिम आहेत. HTK, HTK (O), HTK+, HTX, HTX+, आणि HTX+ (O) -. याशिवाय दोन इंजनची ऑप्शन आहे. एक 120bhp, 1.0L टर्बो पेट्रोल आणि दुसरा 116bhp, 1.5L डीझल, जेव्हा पेट्रोल इंजन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी गियरबॉक्ससोबत उपलब्ध आहे. डिझेल यूनिटला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कनवर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येऊ शकतं. ऑटोमॅटिक गेयरबॉक्स असणारं हाय वेरिएंटमध्ये पॅडल शिफ्टर्सची देखील सुविधा आहे.
सुरक्षेचा तुम्ही विचार करत असाल तर किआ सीरसमध्ये कंपनीन 6 एअरबॅग, 16 सेल्फ कंट्रोल फीचर्ससोबत रडारवर आधारित आहे -2 ADAS त्यात सहभागी आहेत.
हेही वाचा : विराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
सॉनेट आणि सेल्टॉस पेक्षा ही कार थोडी वेगळी आहे. सिरोस नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजनसोबत उपलब्ध नाही. कंपनी 1-लीटर टर्बो पेट्रोल इंजन आणि 1.5-लीटर डीजल इंजन देते.