Hrithik Roshan चा High Protein Diet माहित आहे का? तुमच्यासाठी विशेष टिप्स

हृतिक रोशनला त्याच्या फिटनेस आणि अभिनयासाठी प्रंचड ओळखले जाते. 

Updated: Oct 18, 2022, 05:42 PM IST
Hrithik Roshan चा High Protein Diet माहित आहे का? तुमच्यासाठी विशेष टिप्स title=
Do you know Hrithik Roshan High Protein Diet Special tips nz

What does Hrithik Roshan Eats In A Day: बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या नवनवीन लूक आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असतात. अनेक स्टर्स त्यांच्या फिटनेसला घेऊन अतिशय मेहनत घेत असतात. त्यांच्या जबरदस्त व्यायाम आणि डाईटच्या व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसतात. हृतिक रोशनला त्याच्या फिटनेस आणि अभिनयासाठी प्रंचड ओळखले जाते. 

आणखी वाचा - करवा चौथनंतर विकी कौशलचे तालरंग बदलले? कतरिनाला जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही घाम फुटेल

 

जेव्हा फिट आणि  टोन्ड बॉडीचा विचार  केला जातो तेव्हा हृतिक रोशनचे नाव सर्वात आधी घेतले जाते. आजही त्याचे अॅब्स पाहून लोक आश्चर्यचकित होतात. साहजिकच अशा शरीराच्या मागे खूप मेहनत घ्यावी लागत असेल. कलाकार जसेच्या तसे दिसावेत यासाठी ते खूप मेहनत घेतात. आज आम्ही तुम्हाला हृतिकचा डायट प्लॅन कसा आहे हे सांगणार आहोत..(Do you know Hrithik Roshan High Protein Diet Special tips nz)

आणखी वाचा - उर्फीला अपघातात सावरलं या मुलांनी... नाहीतर तो क्षण तिच्यासाठी ठरला असता...

 

 

हृतिकच्या वैयक्तिक पोषणतज्ञांचे काय म्हणणे आहे -

आहाराची निवड करताना तो आहार संतुलित असण्यावर भर द्यावा. त्या आहारातून पोषण मिळेल यावर जास्त विचार करणे गरजेचे आहे. हृतिक त्याच्या आहाराला चांगलंच गांभीर्याने घेतो. हृतिकचे चवीष्ट पण सोबतच पोषणयुक्त आहार घेण्यावर जास्त भर असतो.  

हृतिक हा थ्री मील पैटर्न चा वापर करतो जसे की नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.  तो क्वचितच संध्याकाळचा नाश्ता करतो.  त्यांचा नाश्ता हा अंडी किंवा प्रोटीन स्मूदीने भरलेला असतो. दुपारच्या जेवणात, तो भात, क्विनोआ, पिष्टमय भाज्या आणि काही प्रथिने आणि चरबी यासारखे हलके कर्बोदके घेतो. रात्रीच्या वेळी तो कोणत्याही प्रकारचे कार्ब घेत नाही.

आणखी वाचा - घट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही

 

 

पोटाला आराम देणे ही तितकंच महत्त्वाचे आहे. कधी कधी उपवास केल्यास तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होतो.  कोणत्या वेळी खावे, कधी खाऊ नये आणि किती खावे या सगळ्यांवर आपली तब्येत ठरत असते. यासोबतच ते वर्कआउटवरही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. दररोज स्वत:साठी  अर्धातास काढून व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)