वजन कमी करा तेही झोपून, कोणत्याही व्यायामाविना, कसं ते जाणून घ्या

तुम्हालाही वजन कमी करायचंय पण व्यायामाचा कंटाळा, 'ही' ट्रिक नक्की वापरा!

Updated: Oct 18, 2022, 05:37 PM IST
वजन कमी करा तेही झोपून, कोणत्याही व्यायामाविना, कसं ते जाणून घ्या title=

Weight Loss While Sleeping : वजन कमी करणं काही सोपं नाही. कारण यासाठी नियमितपणे योग्य प्रमाणात आणि वेळेवर आहार, व्यायाम करावा लागतो. मात्र व्यस्त जीवनशैली आणि आळशीपणामुळे हे अनेकांना फॉलो करणं जमत नाही. आहार कमी केल्याने वजन कमी होतं असं नाही पण तरीही काहींना भूक निघत नाही. पण तुम्हाला माहिती का झोपूनही तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. आता हे नक्की कसं जाणून घ्या. (You Can loss weight while sleeping in these ways latest marati Heath News)

काही लोकांना जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय असते. मात्र असं केल्याने याचा थेट पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे चयापचय मंदावते आणि तुमचं वजन वाढू शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर लगोलग झोपणं टाळा आणि झोपण्याआधी किमान 4 तास जेवण करून घ्या.  त्यासोबतच शक्य असल्यास झोपण्याआधी शतपावली करा.

ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप चांगला मानला जातो. ग्रीन टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे पदार्थ असतात जे चयापचय वाढवण्यास मदत करतात. ज्या लोकांना झोपण्यापूर्वी काहीतरी खाण्याची सवय आहे, अशा लोकांनी झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊन झोपावे. झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिल्याने चयापचय वाढण्यास मदत होते आणि वजन कमी होऊ शकते.

अधूनमधून उपवास केल्याने शरीरातील साखरेचे साठे संपतात आणि चरबी जाळू लागते. रात्री झोपण्यापूर्वी किमान 4 तास काहीही खाऊ नका. या दरम्यान फक्त पाणी प्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)