पिवळी शिमला मिरची खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये? जाणून घ्या

Benefits of Yellow capsicum : पिवळी शिमला मिरची खाण्याचे फायदे काय आहेत.

Updated: Nov 14, 2022, 11:38 PM IST
पिवळी शिमला मिरची खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये? जाणून घ्या title=

Benefits of Yellow capsicum : आपल्यापैकी बहुतेक लोकांनी आतापर्यंत हिरवी शिमला मिरची खाली असेल. पण लाल आणि पिवळी शिमला मिरची देखील बाजारात मिळते. पिवळ्या रंगाची शिमला मिरची खाणे देखील फायदेशीर आहे. कारण रंगीबेरंगी फळे आणि भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. पिवळ्या शिमला मिरचीमध्ये अनेक पोषक तत्व असतात.

पिवळी शिमला मिरची मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे  फ्री रॅडिकल्सशी लढतात. ज्यामुळे शारीरिक आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवण्यापासून रोखता येतात. या फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. पिवळ्या शिमला मिरचीचे सेवन केले तर ते शरीरातून मुक्त रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात.

पिवळी शिमला मिरची शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. कारण त्यात उच्च प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबर असतात. ही भाजी नॅचरल बॉडी क्लिन्जर म्हणून काम करते.

पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही हिरवी, लाल शिमला मिरची तसेच पिवळी शिमला मिरचीचे सेवन करु शकता. कारण, त्यात फायबर असते, जे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. पाचक प्रणाली आणि आतड्यांसंबंधी हालचालींचे नियमन करते.

पिवळी शिमला मिरची उच्च कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.  पिवळ्या शिमला मिरचीचे सेवन केल्याने रक्तदाबही निरोगी राहतो.

केसांच्या आरोग्यासाठी देखील पिवळी शिमला मिरची महत्त्वाची असते. केसांचे कूप सक्रिय करण्यासाठी आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यासाठी पिवळी शिमला मिरची मदत करते. पिवळ्या शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे इत्यादी सोबत लढण्यास मदत करतात.