मुंबई : डॉक्टर हा रूग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत ठरतो. पण....
जेव्हा रूग्णावर उपचार करताना डॉक्टर स्वतःचा जीव गमावतो तेव्हा.... वाचून स्तब्ध झालात ना. 29 डिसेंबर रोजी झाओ या 43 वर्षीय या रूग्णावर उपचार करताना खाली कोसळल्या आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. झाओ या श्वसनावरील आजारावरील तज्ञ असून नेमकं असं काय झालं की त्यांच्या यावर मृत्यू झाला. रिपोर्टनुसार सलग १८ तास त्या काम करत होत्या आणि याचदरम्यान त्यांना स्ट्रोक आला. २० तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलंय.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सलग १८ तास काम केल्याने तिच्या मेंदूत रक्तस्राव झाला. आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.डॉ. झाओ यांनी त्यांची नाईट शिफ्ट साधारणतः संध्याकाळी ६ वाजल्याच्या अगोदरच सुरू केली होती. थोडीशीही विश्रांती न घेता त्या काम करत होत्या.
इतर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, डॉ. झाओ यांना वर्कोहोलिक होत्या. इतर काही करण्यापेक्षा त्या काम करण्यास जास्त प्राधान्य द्यायच्या. काम करताना त्या सहसा विश्रांतीही घ्यायच्या नाहीत. झाओ यांनी कोणताही आराम न करता सगल 18 तास काम केलं होतं. रात्री सुरू केलेली शिफ्ट तिने दुपारी 12 वाजता संपवली. सकाळी 6 ला पुन्हा दुसरी शिफ्ट सुरू केली. कोणताही आराम न करता सलग 18 तास काम केल्यामुळे हा प्रकार घडला.