तुमची सकाळची एक चूक करेल संपूर्ण दिवसावर परिणाम, आजच टाळा

बदलत्या लाईफस्टाईल आणि जंक फूडच्या सेवनामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Updated: May 6, 2022, 04:04 PM IST
तुमची सकाळची एक चूक करेल संपूर्ण दिवसावर परिणाम, आजच टाळा title=

मुंबई : बदलत्या लाईफस्टाईल आणि जंक फूडच्या सेवनामुळे अनेक लोकं अॅसिडिटीसारख्या गोष्टींना सामोरे जातात. वाढत्या एसिडिटीला कंट्रोल करण्यासाठी अनहेल्दी लाईफस्टाईल बदलणे गरजेचे आहे. सर्वात आधी अॅसिडिटी वाढवण्याऱ्या गोष्टींचे सेवन करणे महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळचा चहा

जर तुम्हाला सकाळी उठून उपाशी पोटी चहा पिण्याची सवय असेल तर सावधान कारण चहामुळे सुद्धा अॅसिडिटी होण्याची शक्यता असते. जर उपाशी पोटी चहा प्यायलात तर बाईल ज्यूसवर वाईट परिणाम जाणवतात.  

'या' गोष्टींपासून सावधान     

उपाशी पोटी फक्त चहाच नाही तर मसालेदार गोष्टींचेही सेवन करणे हानिकारक ठरु शकते. तसेच हॉट कॉफी, तेलकट आहार, चॉकलेट अशा गोष्टींचा सामवेश असलेल्या वस्तूंपासून लांब राहणे गरजेचे.

अॅसिडिटीपासून बचावासाठी रोज सकाळी काय करायचं?

जर सकाळाचा चहा तुमच्यासाठी गरजेचा असेल तर चहात आलं टाकून चहा बनवू शकतात. जेणेकरुन एसिडिटीच्या त्रासापासून दिलासा मिळेल. सकाळच्या नाश्ट्यात ओटमीलचा समावेश करावा. ओटमीलमुळे पोटात गॅस आणि पचनक्रीया निरोगी राहील.

सकाळी उकडलेले अंड्यांचा समावेश करावा, जेणेकरुन पोटाची समस्या उद्धभवणार नाही. तसेच हिरव्या भाज्या आरोग्यादायी असतात त्यामुळे याचेही सेवन उपयुक्त ठरु शकतं. सकाळी खाल्यानंतर वॉकसाठी नक्की जा ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होणार नाही.