Facial Exercise: सध्याच्या युगात प्रत्येकालाच सुदृढ शरीर आणि निरोगी आयुष्य हवं आहे. पण, यामध्ये अडथळा निर्माण होतोय तो म्हणजे Double Chin चा. आरशासमोर उभं राहिल्यानंतर हनुवटीच्या खालच्या भागातही मांस दिसून येतं आणि आपलं वजन वाढल्याची बाब समोर येते. आपण स्थूल होत असल्याचीच ही नकोशी जाणीव. (Double Chin daily exercise tips)
शरीरात होणारा हा बदल नजरेत आल्यानंतर लगेचच त्यापासून सुटका करुन घेण्यासाठीचे मार्ग शोधण्याची घाई अनेकजण करतात. यामध्ये Double Chin नाहीशी व्हावी यासाठीचे व्यायामप्रकार शोधणाऱ्यांची संख्याही जास्त.
चला तर मग जाणून घेऊया असेच काही व्यायामप्रकार
पाउट एक्सरसाइज (Pout Exercise)
तसं पाहिलं, तर पाऊट हा मुलींचा आवडीचा व्यायामप्रकार. पण, तुम्हाला माहितीये का, यामुळं चेहऱ्यावर असणारी अतिरिक्त चरबी कमी होते. दररोज तुम्ही 10 ते 12 वेळा किमान 3 सेकंदांसाठी पाऊट करत आहात, तर तुमची डबल चीन कमी होण्यासाठी फार वेळ लागणार नाही.
टंग एक्सरसाइज (Tongue Exercise)
डबल चीन कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त जीभ बाहेर काढून 10 ते 20 सेकंदांसाठी एक- एका बाजुला हलवायची आहे. असं केल्यास जॉ लाईन शार्प होते.
सीलिंग किस (Ceiling Exercise)
हा तर अगदी सोपा व्यायाम प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्ही फक्त खोलीच्या छताच्या दिशेनं पाहत मान वरच्या दिशेनं करतच पाऊट करायचा आहे. यामुळं तुमच्या मांसपेशींमध्ये तणाव निर्माण होईल आणि चेहऱ्यावर असणारी चरबी कमी होईल.
अल्फाबेट एक्सरसाइज (Alphabet Exercise)
आपण 'ओ'/ O चा उच्चार करतो त्याचप्रमाणे ओठांची रचना ठेवावी. असं 10 ते 15 वेळा केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील चरबी आपोआपच कमी होईल.
(Disclaimer: वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांतून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)