Allergies During Monsoon: पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक आजार पसरतात. यामध्ये बुरशी संसर्गामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. अस्थमा आणि ब्रॉंकायटिसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. हवेतील परागकण, धुलीकण आणि ओलसरपणामुळे ॲलर्जीची समस्या उद्भवते. एखाद्या व्यक्तीला अशा ॲलर्जीमुळे दमा, ब्राँकायटिस, ॲलर्जीक राईनाइटिस आणि परागज्वर होण्याचा धोका अधिक असतो.
बुरशीमुळे होणारी ॲलर्जी- हवेतील दमटपणा आणि ओलावा हे बाथरूम आणि स्वयंपाकघरात बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते. शिंका येणे, खोकला येणे, डोळ्यातून पाणी येणे आणि श्वासोच्छवासाची समस्या यासारखी लक्षणे आढळतात.
धुलीकण- खाज सुटणे, छातीत घरघर होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे यासह ॲलर्जीक प्रतिक्रिया आढळून येते.
परागकण- हे ॲलर्जीस कारणीभूत ठरते आणि नाक चोंदणे, घश्याला खाज सुटणे आणि डोळयातून पाणी येणे अशी लक्षणे दिसून येतात.
ॲलर्जीचे निदान : ॲलर्जीचा शोध घेण्यासाठी स्पायरोमेट्री (फुफ्फुसाचे कार्य चाचणी) आणि ब्रोन्कोप्रोव्होकेशन चाचणी, एक्स-रे, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या केल्या जातात. तज्ज्ञांकडून वैद्यकीय इतिहास जाणुन घेतला जाईल आणि विशिष्ट ऍलर्जीचे निदानाकरिता लक्षणांचा अभ्यास केला जातो. वेळीच योग्य उपचार सुरू केल्यास भविष्यातील त्रास कमी होतो.
मुंबईतील एमडी डॉक्टर डॉ संदीप के बॅनर्जी यांच्या सांगण्यानुसार, या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावी लागतील. स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करणं धोकादायक ठरु शकतं. पावसाळ्याच्या दिवसात ॲलर्जीचा धोका टाळण्यासाठी खाली दिलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा.