नेहमीच्या या '5' सवयींमुळे वाढतो दातांंचा पिवळेपणा

चहा, कॉफी अधिक प्रमाणात प्यायल्यास किंवा अ‍ॅसिडीक फळं, भाज्या यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास दातांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.

Updated: Jan 6, 2018, 11:30 AM IST
नेहमीच्या या '5' सवयींमुळे वाढतो दातांंचा पिवळेपणा  title=

मुंबई : चहा, कॉफी अधिक प्रमाणात प्यायल्यास किंवा अ‍ॅसिडीक फळं, भाज्या यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास दातांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.

अनेकदा या कारणामुळेच दात पिवळसर होतात. परंतू दात पिवळे होण्यामागे तुमच्या नेहमीच्या काही सवयीदेखील कारणीभूत ठरतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकतील पण 'या' सवयींमुळे दात पिवळे होऊ शकतात.  

दात खूप वेळेस किंवा जोरदार घासल्याने 

तोंडाचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी दात घासण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सतत किंवा जोर जोराने दात घासण्याची सवयचं दातांना अधिक पिवळे करते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 
 
 जोरात किंवा सतत  दात घासल्याने दातांवरील पातळ इनॅमलचा थर नाहीसा होतो. परिणामी  दात अधिक पिवळे दिसतात.  

फ्लॉसिंग 

दात घासण्याच्या सवयीप्रमाणेच फ्लॉसिंग करणंदेखील दातांसाठी फायदेशीर ठरते. फ्लॉसइंग नियमितन केल्याने दातांवर बॅक्टेरियल अटॅक होतो. प्लाग साचून राहतो. 

माऊथवॉश 

तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी अनेकदा माऊथवॉश वापरला जातो. मात्र त्याचा अतिवापर किंवा चुकीची निवड दातंच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 
अ‍ॅसिडीक माऊथवॉशमुळे दातावरील इनॅमलचा थर कमी होतो. परिणामी दात अधिक पिवळसर दिसतात. 

टुथपेस्ट 

टुथपेस्टमधील फ्लोराईड घटक दातांवर पिवळसरपणा अधिक प्रमाणात वाढवतात. त्यामुळे टुथपेस्ट विकत घेण्यापूर्वी त्यावरील पॅकेज नक्की तपासून वाचा.