Protein Intake: सावधान! प्रोटीनचं अतिसेवन शरीरासाठी घातक; जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं?

Protein Intake: एका दिवशी तुमच्या शरीराला किती प्रोटीनची ( Protein ) गरज असते हे जाणून घेऊया. शिवाय प्रोटीनच्या ( Protein ) अतिसेवनाने तुमच्या शरीरावर काय त्रास होतो हे जाणून घेऊया. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 9, 2024, 10:08 AM IST
Protein Intake: सावधान! प्रोटीनचं अतिसेवन शरीरासाठी घातक; जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं? title=

Protein Intake: फीट आणि फाईन रहायचं असेल तर योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. जर तुमचा आहार बॅलन्स असेल तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त राहता. आपल्यापैकी अनेक जण विटामिन्स आणि मिनरल्सचं सेवन अधिक करतात. यामध्ये प्रोटीनचा ( Protein ) देखील समावेश असतो. प्रोटीन ( Protein ) आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. मात्र गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट आपल्या शरीरासाठी चांगली नाही.

मग आता तुमच्या मनात प्रश्न असेल की प्रोटीन किती प्रमाणात घ्यावं? यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका दिवशी तुमच्या शरीराला किती प्रोटीनची ( Protein ) गरज असते याबाबत माहिती देणार आहोत. शिवाय प्रोटीनच्या ( Protein ) अतिसेवनाने तुमच्या शरीरावर काय त्रास होतो हे जाणून घेऊया. 

वजनात वाढ होणं

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुमच्या व्यायाम करत नसाल, तर अतिरिक्त प्रोटीन ( Protein ) शरीरात चरबीच्या रूपात एकाच ठिकाणी जमा होतात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागण्याची शक्यता अधिक असते.

अन्नपचन होण्यास समस्या होणं

अधिक प्रमाणात प्रोटीनचं ( Protein ) सेवन करणाऱ्या लोकांना पचनाच्या समस्या असू शकतात. कारण प्रोटीन ( Protein ) पचायला वेळ लागतो. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवरही दबाव टाकते.

ताकद कमी होऊ शकते

जर तुम्ही तुमच्या आहारातील प्रोटीनचं ( Protein ) प्रमाण वाढवलं ​​तर तुम्ही कार्बोहाइड्रेट आणि फॅट्स कमी कराल. प्रोटीन पचायला वेळ लागेल, त्यामुळे शरीराची तात्काळ ऊर्जेची गरज भागणार नाही. अशावेळी ताकद कमी होण्याची समस्या भेडसावू शकते. 

डायरिया

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीनच्या ( Protein ) सेवनाने पचनसंस्थेवर परिणाम होतो. यावेळी डायरिया म्हणजेच अतिसाराचा त्रास होऊ शकतो. 

एका दिवसात शरीराला किती प्रोटीनची असते गरज?

प्रोटीनची ( Protein ) गरज ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांना एका दिवसात 56 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. तसंच महिलांनी एका दिवसात सुमारे 46 ग्रॅम प्रोटीनचं सेवन केलं पाहिजे. जीममध्ये जाणाऱ्या, वजन वाढवणाऱ्या व्यक्तींचं शरीराला लागणाऱ्या प्रोटीनचं   ( Protein ) प्रमाण वेगळं असू शकतं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)