Fact Check : नाकात लिंबूचा रस टाकल्यावर कोरोना व्हायरस होणार का नष्ट?

सोशल मीडियावर व्हायरल होणारे उपाय किती योग्य की अयोग्य 

Updated: May 4, 2021, 10:11 AM IST
Fact Check : नाकात लिंबूचा रस टाकल्यावर कोरोना व्हायरस होणार का नष्ट?  title=

मुंबई : कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) भारतात अतिशय झपाट्याने पसरत आहे. यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे आता सामान्यांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती प्रत्येकजण कोरोनापासून वाचण्याचे सर्व उपाय करत आहेत. अशावेळी सोशल मीडियावर वेगवेगळे उपाय व्हायरल होत असतात. एवढंच नव्हे तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाचवण्यासाठी करावे लागणारे उपाय देखील सुचवत असतात. 

लिंबाच्या दोन थेंबानी संपुष्टात जाणार का कोरोनाचा व्हायरस?

सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी फायदेशीरच असेल असं नाही. कधी कधी कोणताही पडताळणी न करता केलेली गोष्ट तुम्हाला घातक ठरू शकतं. असंच सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिंबाच्या रस दोन थेंब नाकात टाकल्यावर कोरोना व्हायरस संपुष्टात होणार आहे. 

एका व्हिडिओत एका व्यक्तीने दावा केला आहे की, लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब नाकात घातल्याने कोरोना संपणार आहे. आणि हा रामबाण उपाय असल्याचा दावा देखील या व्यक्तीने केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पीआयबीने याचं फॅक्ट चेक करत हे खोटं असल्याचं म्हटलं आहे 

PIB मार्फत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची सत्यता तपासण्यात आली आहे. पीआयबीने या व्हिडिओला खोटा आणि चुकीचा व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, असा कोणतंच वैज्ञानिक प्रमाण नाही की, लिंबाचा रस नाकात टाकल्याने तुमच्या शरीरात असलेला कोरोना नष्ट होणार आहे. 

या अगोदरही अशा पद्धतीचे घरगुती उपाय सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर ओवा, कापूर, लवंग आणि निलगीरीचं तेल अशा पदार्थांची पोटली बनवून त्याचा सतत वास घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.