Adulterated Panner : तुमच्या ताटात भेसळयुक्त पनीर?

तुम्ही आवडीनं पनीर खाता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एफडीनं तब्बल 900 किलोंचं बनावट पनीर पकडलंय.   

Updated: Sep 6, 2022, 11:10 PM IST
Adulterated Panner : तुमच्या ताटात भेसळयुक्त पनीर? title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : तुम्हाला पनीर (Panne) आवडत असेल ही बातमी तुमच्यासाठी आहे. एफडीएनं कारवाई करत तब्बल ९०० किलो बनावट पनीर जप्त केलंय. ऐन सणांच्या काळात ही कारवाई झालीय. कुठे केलीय ही कारवाई पाहुयात एक रिपोर्ट. (ganeshotsav 2022 fda seized 900 kg adulterated panner in pune)

तुम्ही आवडीनं पनीर खाता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एफडीनं तब्बल 900 किलोंचं बनावट पनीर पकडलंय. पुण्यात एफडीएनं ही कारवाई केलीय. मंचर इथल्या महावीर डेअरी अँड स्वी मार्टवर एफडीएनं छापा टाकला. पुण्यातल्या या छाप्यात.

तुमच्या ताटात भेसळयुक्त पनीर?

889 किलो बनावट पनीर, 119 किलो बनावट खवा आणि  5 लाख किंमतीचा कच्चा माल जप्त करण्यात आलाय.

सध्या सणासुदीचा काळ आहे. नैवेद्यापासून भेटवस्तूपर्यंत प्रत्येक कारणासाठी मिठाई घेतली जाते, त्यात लाखो रुपये किंमतीचं बोगस पनीर आणि बनावट खवा जप्त करण्यात आलाय. 

पुण्यातल्या एफडीएच्या या धडक कारवाईमुळे राज्यात खळबळ उडालीय. असोत तुम्हीही मिठाई घेताना सतर्क राहा, त्याच्यावरची एक्सपाईरी डेट चेक करा.