गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड : ओम शंकर रवी यांचा पाण्यात सलग २४ तास योगा

सलग २४ तास योगा करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्डमध्ये या विक्रमाची नोंद

Updated: Jun 21, 2018, 09:15 AM IST

मुंबई : योग दिनाच्या निमित्तानं देशभरात योगाचे विविध प्रयोग राबवले जात आहे. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राजस्थानच्या कोटामध्ये एका योग अभ्यासकानं अभिनव प्रयोग केलाय. ओम शंकर रवी या योगा अभ्यासकानं पाण्यात योगा करण्याचा निर्धार केलाय. सलग २४ तास योगा करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात येणार आहे. शीर्षासन, कपालभाती, पद्मासन, सूर्य नमस्कार आणि विविध योगासनं ओम शंकर रवी पाण्यातच करणार आहे. ओम शंकर रवी दरवर्षी योगा दिनाला वेगवेगळे विक्रम करतात. यंदाही ते पाण्यात २४ तास योगा करण्याचा विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाले आहेत.