मुंबई : आपल्याकडे काही चहाप्रेमींची कमी नाही. पावसाळा सुरु होताच तर चहाप्रेमाला अधिकच उधाण येते. रिमझिम पावसात खिडकीत बसून गरमागरम चहा पिण्यासारखे सुख दुसरे नाही. त्यामुळे फ्रेश, आनंदी वाटते. मनही शांत होते. पण या ३ प्रकारे चहा बनवल्यास तो आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. याची माहिती सेलिब्रेटी न्युट्रीशियनिस्ट रुजूता दिवेकरने नुकतीच आपल्या फेसबुक पोस्टवरुन दिली. जाणून घेऊया कसा बनवायचा हा आरोग्यदायी चहा...
चहा बनवताना त्यात आलं आणि तुळस घाला. त्यामुळे पचनक्रिया आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.
गवती चहा चवीला तर सुरेख लागतोच. पण त्याचबरोबर आरोग्यदायीही असतो. पावसाळ्यात ब्लॉटिंग, congestion चा त्रास टाळण्यासाठी गवती चहा अवश्य प्या.
इन्सुलिन सेन्सिटीव्ही सुधारण्यासाठी चहात काळीमिरी किंवा दालचिनी घाला.
टिप- मलाईयुक्त दूध आणि चवीला साखर घाला. मात्र skimmed milk किंवा स्विटनर्सचा वापर टाळा.