मुंबई : केस गळणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. तसे केस गळण्याचे कोणतेही एक कारण नाही पण, तुमच्या आहारात अशी काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचे टक्कल लवकर होऊ शकते. तुम्हाला माहीत नसेल, पण तुम्ही रोज असे पदार्थ किंवा पेये घेत असता, ज्यामुळे तुमचे केस सतत गळत असतात. याचाच अर्थ असा की, केस गळतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपला आहार.
उच्च पोषणाचे सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होते, तर काही गोष्टी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. केस गळण्यास कारणीभूत असलेले पदार्थ आजपासूनच तुमच्या आहारातून काढून टाकावेत, नाहीतर तुमची केस गळतीची समस्या थांबनारच नाही.
सर्व जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकत नाही, तर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग देखील होऊ शकतात. एसएफए आणि एमयूएफए समृद्ध आहार टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकतो.
यामधील DHT एक एंड्रोजन आहे ज्यामुळे टक्कल पडू शकतं. याव्यतिरिक्त, तेलकट टाळू तुमच्या डोक्यावरील छिद्र बंद करू शकते आणि केसांचे कूप लहान करू शकतात. ज्यामुळ तुमच्या डोक्यावर टक्कल पडू शकतं.
अंडी केसांसाठी खूप चांगली असतात पण ती कच्चे खाऊ नयेत. कच्च्या अंड्याचा पांढरा भाग बायोटिनची कमतरता निर्माण करू शकतो, यामधील जीवनसत्व जे केराटिनच्या उत्पादनात मदत करते. परंतु कच्च्या अंड्याच्या पांढऱ्यामध्ये असलेले एव्हिडिन बायोटिन आतड्यांतील शोषणात व्यत्यय आणते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते.
माशांमध्ये आढळणारा पारा अचानक केस गळण्याचे कारण ठरु शकते. पारा एक्सपोजरचा सर्वात सामान्य स्त्रोत म्हणजे मासे. स्वॉर्डफिश, बांगड, शार्क किंवा मुशी आणि काही प्रकारच्या ट्यूना फिश या सागरी माशांमध्ये पारा असतो. त्यामुळे ते खाणं टाळा.
होय, साखर तुमच्या केसांसाठी जितकी वाईट आहे तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने तुमचे केस गळू शकतात. यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही टक्कल पडू शकते.
उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नामुळे इन्सुलिन स्पाइक होतात. मैदा, ब्रेड आणि साखर यांसारखे पदार्थ उच्च जीआय असतात. हे पदार्थ हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात आणि इन्सुलिन आणि एन्ड्रोजनमध्ये वाढ होऊ शकतात, ज्यामुळे केसांच्या कूपांना संकुचित होते आणि केस गळतात.
केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. केराटिन हे एक प्रोटीन आहे, जे तुमच्या केसांना टेक्सचर देते. अल्कोहोलचा प्रोटीन संश्लेषणावर नकारात्मक परिणाम होतो आणि केस कमकुवत आणि निस्तेज होऊ शकतात. याव्यतिरिक्त, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पौष्टिक गोष्टी असंतुलीत होतात.
खाण्याच्या सोडामध्ये एस्पार्टेम नावाचे एक कृत्रिम स्वीटनर असते, जे संशोधकांना आढळले आहे की, केसांच्या मुळांना नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला अलीकडे केस गळतीचा अनुभव येत असेल, तर आहारात सोडा पूर्णपणे टाळा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)