जाणून घ्या कंटोळीचे (कर्टुल) शरीरासाठी लाभदायी औषधी गुण

कंटोळीची वाढती मागणी लक्षात घेता, याची शेती जगभरात सुरू करण्यात आली आहे.   

Updated: Apr 10, 2019, 02:10 PM IST
जाणून घ्या कंटोळीचे (कर्टुल) शरीरासाठी लाभदायी औषधी गुण  title=

मुंबई : बदलती जीवनशैली आणि जंकफूडच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हिरव्या भाज्या नेहमीच शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवते. शरीर बळकट बनवते. परंतु या सर्व हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या अशा आहेत ज्या अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते. कंटोळी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते. कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते.

आयुर्वेदात कंटोळी सर्वात ताकदवान भाजी मानली जाते. कंटोळी चवीला उत्तम असून भरपूर प्रथिनेयुक्त (प्रोटीन) आहे. दररोज कंटोळीचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते. कंटोळीमध्ये मांसाहारापेक्षाही अधिक प्रोटीन असतात. कंटोळीमध्ये असणारे फायटोकेमिकल्स शरीर निरोगी बनवतात. कंटोळीत असणारे अॅन्टीऑक्सिडेंट रक्त शुद्ध करतात त्यामुळे त्वचासंबंधी रोगांपासूनही बचाव होतो.

पावसाळ्याच्या सुरूवातील बाजारात येणारी कंटोळी अनेक मार्गांनी शरीरासाठी फायदेशीर आहे. कंटोळीची वाढती मागणी लक्षात घेता, याची शेती जगभरात सुरू करण्यात आली आहे. देशातील पर्वतीय भागात कंटोळीची शेती केली जाते.

वजन कमी करते -

कंटोळीत प्रोटीन, लोह भरपूर आणि कॅलरी कमी प्रमाणात असतात. १०० ग्रॅम कंटोळीच्या भाजीतून १७ कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी कंटोळी उत्तम पर्याय आहे.

पचनक्रिया सुधारते -

कंटोळीची भाजी खायची नसल्यास त्याचं लोणचंही तयार करता येतं. आयुर्वेदात अनेक रोगांवर याचा औषध म्हणूनही उपयोग केला जातो. पचनक्रिया सुधारण्यासाठी कंटोळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 

उच्च रक्तदाब - 

कंटोळीत असणारे मोमोरडीसिन तत्व आणि फायबर शरीरासाठी रामबाण आहे. मोमोरडीसिन तत्व अॅन्टीऑक्सीडेंट, अॅन्टीडायबिटीज आणि अॅन्टीस्ट्रेसचे काम करते तसेच वजन आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 

अॅन्टीअॅलर्जिक -

कंटोळीत अॅन्टी अॅलर्जन आणि एनाल्जेसिक सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नेत्ररोग, हृदयरोग तसेच कर्करोगाच्या रूग्णांसाठीही कंटोळीचे सेवन फायदेशीर ठरते.