अॅसिडिटीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका? कॅन्सर वाढवणाऱ्या 'या' 26 औषधांवर बंदी

अॅसिडिटीवर औषधं घेताय? सावधान ! आधी ही बातमी वाचा, या औषधांवर घालण्यात आली आहे बंदी

Updated: Sep 14, 2022, 09:59 PM IST
अॅसिडिटीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका?  कॅन्सर वाढवणाऱ्या 'या' 26 औषधांवर बंदी title=

Acidity Tablet Ban : अॅसिडिटीसारख्या लहान मोठ्या आजारांवर तुम्ही घरच्या घरी उपचार घेत असाल, तर सावधान. कारण अॅसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळं तुम्हाला जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो. अशाप्रकारच्या तब्बल 26 औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातलीय... जीवनावश्यक औषधांच्या यादीतून ही 26 औषधं वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 

रॅनिटिडीन हे त्यापैकीच एक औषध. अॅसिडिटीसाठी ते सर्रास वापरलं जातं. 2019 साली अमेरिकेनं त्यावर बंदी घातली, तेव्हापासून भारतातही त्याची काटेकोर पडताळणी सुरू होती. या औषधामध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या एन नायट्रोसोडीमिथाइलमाइनचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक आढळलं. 

कॅन्सर वाढवणाऱ्या 26 औषधांवर बंदी 
रॅनिटिडीन (Ranitidine)
अल्टेप्लेस (Alteplase)
एटेनोलोल (Atenolol)
ब्लिचिंग पाउडर (Bleaching Powder)
कॅप्रोमाइसिन (Capreomycin)
सेट्रिमाइड (Cetrimide)

अशा तब्बल 26 औषधांवर केंद्रानं बंदी घातलीय...

त्यामुळं तुम्ही देखील आता काळजी घ्या. अॅसिडिटीचा त्रास असेल तर नेमकी कोणती औषधं घ्यायची, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर तुमचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.