हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? 'ही' तीन हिरवी पानं अशा पद्धतीने वापरा

Joint Pain In Winter: हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढणे हे खूप सामान्य आहे. अशावेळी घरगुती उपचार करुन तुम्ही त्यावर मात करु शकता. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 30, 2023, 01:38 PM IST
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? 'ही' तीन हिरवी पानं अशा पद्धतीने वापरा  title=
health tips in marathi home Remedies for Arthritis or Joint Pain in Winter

Joint Pain In Winter: हिवाळा हा सगळ्यांचा आवडता ऋतु आहे. हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि वातावरण सगळ्यांनाच आवडते. हिवाळ्यातील थंडीबरोबरच अनेक आजारही वाढीस लागतात. थंडीच्या दिवसांत गेल्या काही दिवसांपासून प्रदुषणाचा मुद्दा गाजतोय. त्याचबरोबर, थंड हवेमुळं कफ आणि सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर, हिवळा सुरू होताच व थंडी वाढताच सांधेदुखीचा त्रासही वाढत जातो. सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेही उपचार करु शकता. 

थंडीच्या दिवसात होणाऱ्या सांधेदुखीमुळं मुळं खूप त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींना किंवा युरीक अॅसिडने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास होतो. पण घरात असलेल्या पदार्थांनी तुम्ही सांधेदुखीवर सहज मात करु शकता. आज आम्ही तुम्हाला अशा तीन पानांविषयी सांगणार आहोत. ज्यामुळं तुमची सांधेदुखी झटक्यात कमी होईल. 

थंडीत सांधेदुखी का होते?

हिवाळ्यात थंडी आणि हवामानात असलेली आद्रता यामुळं  सांधे दुखु लागतात. स्नायूंची लवचिकता कमी होऊन सांधेदुखी, सांधे आखडणं अशा प्रकारचा त्रास होतो. अशावेळी हे तिन हिरवी पाने हिवाळ्याच्या दिवसांत वेदनांपासून आराम मिळवून देऊ शकतात. हाडांची मजबूती आणि सांध्यांचं कार्य योग्य पद्धतीने सुरु राहण्याकरिता सायनोव्हायल फ्लुएड गरजेचं असते. हा एक घट्ट द्रव पदार्थ असतो. हा पदार्थ सांध्यांच्या हालचालींसाठी मदत करतो आणि सांधे एकमेकांवर घासण्यापासून रोखतो.  

 कोरफड 

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोरफडच्या पानांचा वापर वेदना कमी करण्यासाठी करु शकता. याच्या पानांचा गर काढून सांध्यांना लावा. असं म्हणतात की, कोरफडच्या पानांचा गर सूज आणि वेदना कमी करु शकते. 

पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. ते हाडांच्या बळकटीसाठी वापरले जातात. पालकचे नियमित सेवन केल्यास हाडांना बळकटी येते त्याचबरोबर सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो. 

तुळशीची पाने

तुळशीची पाने बहुगुणकारी असतात. आयुर्वेदात तुळसीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. यात सूज कमी करण्याबरोबरच वेदनाशामक गुणदेखील असतात. तुळशीची पाने तुमच्या सांध्यांना आलेली सूज आणि वेदना कमी करतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)