तुपाचे सेवन करताना 'ही' चूक महागात पडेल; आयुर्वेदात सांगितलीये योग्य पद्धत

Way To Eat Ghee: तुप खाणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. पण तुप खाण्याची योग्य पद्धत काय आहे. तुप कधी खावे? याबाबत सविस्तर जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 29, 2023, 11:22 AM IST
 तुपाचे सेवन करताना 'ही' चूक महागात पडेल; आयुर्वेदात सांगितलीये योग्य पद्धत title=
health tips Know the healthiest way to consume ghee In marathi

Ayurvedic Way To Eat Ghee: शुद्ध तुपाचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. प्राचीन काळापासून भारतात जेवणात तुपाचा वापर करतात. शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुपहे फायदेशीर असते. तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास थकवा दूर होतो. इतकंच नव्हे तर, आयुर्वेदात बद्धकोष्टसारख्या आजारांवर तुप हा रामबाण उपाय सांगितला गेला आहे. तसंच, पित्त विकार असलेल्या लोकांनी नियमित तूपाचे सेवन केले पाहिजे, असंही म्हटलं आहे. मात्र, तुपाचे सेवन योग्य प्रमाणात करावे, अन्यथा त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (Way To Eat Ghee In Marathi)

काही जण सकाळी सकाळी रिकाम्या पोटी शुद्ध तूपाचे सेवन करतात. त्यामुळं पाचनसंस्था वाढते, असं म्हटलं जाते. मात्र, सकाळी अनोशापोटी तुपाचे सेवन करणे खरंच फायदेशीर आहे का? हे आज जाणून घेऊया. तज्ज्ञांनी तूपाचे कशाप्रकारे सेवन करावे याची माहिती दिली आहे जाणून घेऊया. 

रिकाम्या पोटी तूप खावे का?

आयुर्वेदानुसार, रिकाम्या पोटी तूप खाणे चुकीचे असल्याचे मानण्यात आले आहे. तूप हे पचायला जड जाते. तूप पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते. योग्य रितीने तूप पचले नाही तर पोट खराब होण्याची शक्यता असते. तसंच, शौचातून दुर्गंधी येऊ शकते. याला स्टीटोरिया असं म्हणतात. 

अशा पद्धतीने करा तुपाचे सेवन

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तुप चांगल्या पद्धतीने शिजवून घ्या मगच त्याचे सेवन करा. तुम्ही शुद्ध तुपात डाळ शिजवून किंवा तुपात भाज्या परतवून खाऊ शकता. या पद्धतीने तुपाचे सेवन केल्यास त्यातील सर्व पोषकतत्वे तुम्हाला मिळतील तसंच पाचनसंस्थादेखील सुधारेल. 

डिहायड्रेशन आणि हृदयरोगाचा धोका

काही संशोधनानुसार, स्टीटोरिया, डिहायड्रेशन आणि हृदयविकार यांच्यात थेट संबंध आढळला आहे. या अहवालानुसार, तूपाचे पचन न झाल्यास डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. ज्यामुळं पुढे जाऊन हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता असते. ज्यावेळेस रक्त वाहिन्या आंकुचित होतात  तेव्हा हृदयविकार येण्याची शक्यता अधिक असते. 

तुपाचे शरीराला फायदे

तुपामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स यांचा चांगला स्रोत असतो. तसंच विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के हे गुणधर्म तुपात आढळतात. याशिवाय शुद्ध तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडदेखील असते. जखम अथवा त्रास होत असेल तर लवकरात लवकर बरं करणारी पोषक तत्व यामध्ये आढळतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)