शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी? यापुढे गेलं तर...

Normal Cholesterol Level: शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. यामध्ये LDL म्हणजेच लो डेंसिटी लिपोप्रोटीन याला वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं. तर दुसरीकडे HDL म्हणजेच हाई डेंसिटी लिपोप्रोटीन शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. LDL नेहमी कमी असलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Updated: Jul 28, 2023, 11:11 AM IST
शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?  यापुढे गेलं तर... title=

Normal Cholesterol Level in Marathi: खराब लाईफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येतेय. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे संबंधित व्यक्तीला विविध त्रास मागे लागण्याची शक्यता आहे. कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलर मानलं जातं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मात्र तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्रॉलची हाय बॉर्डरलाईन किती आहे? 

2 प्रकारचे असतात कोलेस्ट्रॉल

मानवाच्या शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. यामध्ये LDL म्हणजेच लो डेंसिटी लिपोप्रोटीन याला वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं. तर दुसरीकडे HDL म्हणजेच हाई डेंसिटी लिपोप्रोटीन शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. LDL नेहमी कमी असलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

फीट व्यक्तीसाठी किती असली पाहिजे कोलेस्टरॉल लेवल

तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल ही लिपिड प्रोफाइल टेस्टच्या माध्यामातून समजते. जर तुम्ही ही टेस्ट केली असेल आणि त्यामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL 100 पेक्षा कमी असेल तर कोणतीही अडचण नाही. जर तुम्ही हार्ट पेशंट आहात आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल 100 ते 129 mg/dL असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. 

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणती आरोग्यासंबंधी समस्या नसेल आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल 100 ते 129 mg/dL असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. या टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल 130 ते 159 mg/dL असेल तर याला हाय म्हणजेच बॉर्डरलाईन कोलेस्ट्रॉल मानलं जातं. 

इतकंच नाही तर ज्या व्यक्तींचं कोलेस्ट्रॉल 160 ते 189 mg/dL असेल तर ते हाय आणि धोकादायक या लिस्टमध्ये समाविष्ट होतं. यापेक्षा जास्त म्हणजे, 190 पेक्षा ज्यांचं कोलेस्ट्रॉल अधिक असतं, त्यांच्या आरोग्यासाठी ही धोक्याची पातळी आहे. 

LDL कोलेस्ट्रॉल कसं कमी कराल?

वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. जर तुम्हाला LDL कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतील. यामुळे बऱ्याच प्रमाणात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला अधिक फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत.  

त्यामुळे रूग्णांनी त्यांच्या आहारामध्ये ओट्स, संपूर्ण धान्य तसंच बार्ली यांचा समावेश करावा. याशिवाय भाज्यामध्येमध्ये शेंगा, वांगी, भेंडी या भाज्या खाल्ला पाहिजेत. यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होण्यास मदत होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x