Healthy Diet: तुम्हालाही अशक्तपणाची समस्या आहे का? आजकाल कामाच्या अतिरीक्त वेळा यामुळे वेळेवर जेवण होत नाही. अशावेळी जेवणाची वेळ टळल्याने अशक्तपणाची समस्या येऊ शकते. यासाठीच हेल्दी डाएट म्हणजे म्हणजे चांगला आहार अशक्तपणावर मात करण्यास उपयुक्त ठरतो. आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्व आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला पोषकतत्त्व मिळतील असा हेल्दी आहार घेतला पाहिजे.
चांगला आहार, खास नाश्ता तुमचा अशक्तपणा दूर करण्यास आणि उर्जा वाढवण्यास मदत करतं. यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहाड्रेट, झिंक, व्हिटॅमीन यांचा समावेश केला गेला पाहिजे. तर जाणून घेऊया कोणते पदार्थ तुमचा अशक्तपणा दूर करण्यास मदत करतील.
बनवण्यास सोपं, स्वादिष्ट आणि प्रोटीनयुक्त अंडं इन्सुलिनची पातळी राखण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंटचं प्रमाणंही यामध्ये भरपूर असतं. यामुळे अंड्याचा आहारात समावेश केल्याने उर्जा वाढण्यास आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
सकाळचा नाश्ता हेल्दी आणि लाईट असावा असं म्हणतात. अशावेळी उपम्यापेक्षा चांगला पर्याय असू शकतं नाही. उपम्यामध्ये भारतीय मसाले जसं की, आलं, कडीपत्ता आणि जीरं यांचं मिश्रण असतं. त्यामुळे उपमा फार पौष्टिक मानला जातो.
सकाळचा नाश्ता म्हटलं की अनेकांचं उत्तर पोहे असंच असतं. पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. शिवाय यामध्ये अधिक भाज्यांचा समावेश केला तर त्यातील पोषक घटकांचं प्रमाण अजून वाढतं. पोहे आणि ओट्स खाल्ल्यास त्याचा आरोग्याला अजून फायदा होतो.
तुमच्या नियमित इडली पालकचा वापर करून एक नवा आणि हेल्दी ट्विस्ट आणा. याला तुम्ही सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. यामुळे तुम्हाला नाश्तामध्ये जंक फूड खाण्याची इच्छा देखील होणार नाही. शिवाय दीर्घकाळ तुमचं पोट भरलेलं राहील.