Arjun Kapoor on Death of Mother : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची आई मोना यांचं निधन होऊन बराच काळ झाला आहे. दरम्यान, आजही तो क्षण हा अर्जुन कपूरसाठी खूप भावनात्मक आहे. त्यानं लेटेस्ट पॉडकास्टमध्ये त्यांच्याविषयी चर्चा केली. आईच्या निधनानंतर स्वत: ला कसं सांभाळलं आणि आयुष्यात कसं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय बहिणींना कशी साथ दिली या सगळ्याविषयी सांगितलं. घरातील सगळ्यात मोठा मुलगा असल्यानं त्याला स्वत: ला सांभाळण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
राज शमानीच्या पॉटकास्टमध्ये अर्जुन कपूरनं त्याच्या आईला गमावण्याविषयी सांगितलं. तो म्हणाला, तो काळ खूप कठीण होता. माझा भूतकाळ फार वाईट आहे, त्यात खूप ट्रॉमा आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकांना असं वाटतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडणं हे सोपं असतं किंवा होतं. याशिवाय मला या गोष्टीवर देखील कोणती शंका नाही की आउटसाइडर्ससाठी या क्षेत्रात येऊन करिअर करणं किती कठीण असतं. पण तुम्हाला असं का वाटतं की जे आयुष्य मी जगतोय ते जगणं माझ्यासाठी हे आयुष्य फार सोपं आहे.
याच मुलाखतीत आईला गमावण्याविषयी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, 'तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपू शकता. मी असं कधी करु शकत नाही. मी माझ्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपू शकत नाही. देवानं मला देखील काही भावना दिल्या आहेत. पण जे तुमच्याकडे आहे, ते माझ्याकडे नाही. पण यासाठी मी इर्शा करायला हवी का? तुमची आई आहे? मग मी तुमच्याविषयी वाईट विचार करायला हवा? तुमच्याकडे असं काही आहे, जे माझ्याकडे कधीच नसेल. त्यासाठी मी कितीही प्रार्थना केली तरी देखील ती माझ्यासोबत राहणार नाही.'
हेही वाचा : 'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया
अर्जुन कपूरनं सांगितलं की 'आईच्या निधनानंतर तो स्वत: च्या पायावर उभा राहिला आणि अंशुलाचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीनं त्याला मोठं केलं. 'मी एक स्वातंत्र्य असलेला व्यक्ती आहे. माझ्या आई-वडिलांनी देता येईल तितकी मदत केली. पाठिंबा दिला पण आर्थिकरित्या ज्या दिवसापासून मी काम करण्यास सुरुवात केली, त्या दिवसापासून सगळं काही मी स्वत: केलं. माझा पहिला पगार हा इश्कजादे चित्रपटामुळे मिळाला होता आणि माझी आई हे जाणून न घेता गेली की माझं भविष्य या क्षेत्रात आहे. त्यानंतर मी माझ्या वडिलांकडून कधीच काही मागितलं नाही आणि त्यांना हे माहित आहे. त्यांना यावर गर्व आहे की माझ्या आईला देखील यावर गर्व असेल.'