मुंबई : पोटात गॅस झाल्यानंतर होणार्या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे. म्हणूनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हांला फायद्याचे ठरतील.
ओवा – यामधील थायमॉल नामक केमिकल पोटातील गॅस्ट्रिक ज्युस दूर करून पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस मोकळा होण्यास मदत होते. तुम्हांला वारंवार गॅसचा त्रास होत असल्यास जेवल्यानंतर चिमुटभर ओवा चावून खा
आयुर्वेदिक चूर्ण – आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने योग्य चूर्णाची निवड करा. प्रामुख्याने गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा, काळामिरी, जिरं, काळं मीठ, हिंग़ यांचं मिश्रण असते. हे घटक पचन सुधारण्यास आणि गॅस पासून सुटका मिळवण्यास मदत करतात
मसाज – पोटावर योग्य पद्धतीने मसाज केल्यानेही गॅस बाहेर पडण्यास मदत होते. पाठीवर झोपून, पोटात वेदना होणार्या जागी वर्तुळाकार दिशेने बोटांनी मसाज करा. हलकाच दाब दिल्यास या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होते.
हिंग – गॅसपासून सुटका मिळवण्याचा हिंग़ हा देखील झटपट घरगुती उपाय आहे. ग्लासभर गरम पाण्यात एक टीस्पून हिंग मिसळून प्यायल्यास गॅस मोकळा होण्यास मदत होते. तसेच हिंगाची पाण्यात पेस्ट करून पोटावर लावावी. नाभीजवळ वर्तुळाकार दिशेने मसाज करा. ही पेस्ट सुकू द्या. काही वेळाने वेदना कमी होण्यास मदत होईल.
फ्रुट सॉल्ट- बाजारात सहज उपलब्ध होणारे फ्रुट सॉल्ट थंड पाण्यात मिसळून घेतल्यास गॅसपासून सुटका होते. जर फ्रुट सॉल्ट उपलब्ध नसल्यास बेकिंग़ सोडा ग्लासभर पाण्यात मिसळून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा.