काळवंडलेली बोटं पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' घरगुती उपाय

चेहर्‍याच्या सौंदर्याप्रमाणेच हाता- पायाच्या बोटांचं सौंदर्य जपणंदेखील गरजेचे आहे. हायजिनच्या दृष्टीने हाता- पायाची बोटं आणि नखं स्वच्छ ठेवणं गरजेचे आहे. प्रत्येकवेळेस तुम्हांला हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा दूर करण्यासाठी पॅडिक्युर आणि मॅनिक्यूर करायला वेळ नसतो. अशावेळेस हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. 

Updated: May 5, 2018, 06:55 PM IST
काळवंडलेली बोटं पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' घरगुती उपाय

मुंबई : चेहर्‍याच्या सौंदर्याप्रमाणेच हाता- पायाच्या बोटांचं सौंदर्य जपणंदेखील गरजेचे आहे. हायजिनच्या दृष्टीने हाता- पायाची बोटं आणि नखं स्वच्छ ठेवणं गरजेचे आहे. प्रत्येकवेळेस तुम्हांला हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा दूर करण्यासाठी पॅडिक्युर आणि मॅनिक्यूर करायला वेळ नसतो. अशावेळेस हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. 

कसा दूर कराल हाता-पायांच्या बोटांचा काळसरपणा ?  

हाता-पायांच्या बोटांचा काळसरपणा तुम्हांला कमी करायचा असेल तर आंघोळ  करताना नियमित बोटं स्क्रब करणं फायदेशीर ठरते. स्क्रब केल्यानंतर त्यावर क्रीम आणि लोशन लावणं फायदेशीर ठरते. 

बोटांवरील काळसरपणा कमी करण्यासाठी त्यावर मलाईने मसाज करा. 10 मिनिटांनी कोमट पाण्याने त्यांना स्वच्छ करा. या घरगुती उपायाने बोटांवरील काळसरपणा कमी होईल.   

लिंबू आणि साखरेच्या मिश्रणाने डार्क जॉईंटवर मसाज करणं फायदेशीर ठरते. नियमित या उपायाने काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार होण्यास मदत होते.  

घरात ब्रेड असेल आणि त्याची एक्सपायरी डेट उलटून गेलेली असेल तर खाण्याजोगा नसलेला हा ब्रेड तुम्ही स्क्रबर म्हणून वापरू शकता. ब्रेडला दूधात कुस्करून काळवंडलेल्या त्वचेवर लावा. हळूहळू तुम्हांला त्वचेचा रंग सुधारलेला दिसेल. 

बेकिंग सोडादेखील काळवंडलेली त्वचा पुन्हा खुलवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. याकरिता कोमट पाण्यात अर्धा टीस्पून बेकींग सोडा मिसळून त्यामध्ये हात पाय बुडवून 15 मिनिटं बसा. थंड पाण्याने हात-पाय स्वच्छ करा यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा खुलण्यास मदत होईल.