शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

 डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात असलेली विषद्रव्ये, रसायने बाहेर टाकणे. 

Updated: May 5, 2018, 04:38 PM IST
शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

मुंबई : डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात असलेली विषद्रव्ये, रसायने बाहेर टाकणे. शरीरातून टॉक्सिन्स वेळीच बाहेर पडणे गरजेचे आहे कारण त्यामुळे आरोग्यास हानी पोहचते. डिटॉक्सिफिकेशन झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. शरीरातील ऊर्जा वाढते. वजन कमी होण्यास मदत होते. हलके वाटते, त्वचेचा पोत सुधारतो, केसांचे आरोग्य चांगले होते. मात्र यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. पाहुया कोणते आहेत ते पदार्थ...

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यासाठी उत्तम मानले जाते. यात अॅंटीऑक्सीडेंट असतात. त्याचबरोबर कलिंगडात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. शरीरात सोडिअमचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत होते.

काकडी

काकडीत ९५% पाणी असते. यामुळे शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर बॉडी हायड्रेट राहते.

लिंबू

लिंबात व्हिटॉमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात. लिंबामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून शरीर साफ होण्यास मदत होते. 

ग्रीन टी

ग्रीन टी आरोग्यासाठी उत्तम ठरते. उन्हाळ्यात प्यायल्याने त्याचा अधिक फायदा होतो. यात अॅंटीऑक्सीडेंट असतात आणि हानिकारक युव्ही किरणांपासून बचाव करण्याची क्षमता असते. यामुळे उन्हाळ्यात बॉडी हायड्रेट राहण्यास मदत होते.

पुदीना

पुदीन्यात अनेक औषधी गुणधर्म असून शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी तो उत्तम ठरतो.