Brown blood discharge : मासिक पाळीमध्ये ब्राउन ब्लड येणं किती सामान्य? जाणून घ्या

Brown blood discharge : पिरीएड्स दरम्यान महिलांना ब्राऊन ब्लडचा स्राव नेमका का होतो?

Updated: Feb 10, 2022, 11:37 AM IST
Brown blood discharge : मासिक पाळीमध्ये ब्राउन ब्लड येणं किती सामान्य? जाणून घ्या title=

मुंबई : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. अशातच अनेक महिलांना मासिक पाळीवेळी गडद रंगाचा स्राव होतो. मात्र पिरीएड्स दरम्यान महिलांना ब्राऊन ब्लडचा स्राव नेमका का होतो? सामान्य स्थितीमध्ये, जेव्हा रक्त शरीरातून बाहेर पडण्यास वेळ लागतो तेव्हा रक्ताचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. अशा वेळी ऑक्सिडेशनमुळे रक्ताचा रंग बदलतो. ऑक्सिडाइज्ड होणं म्हणजे रक्त ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर त्याचा रंग बदलतो.

मासिक पाळी दरम्यान तपकिरी रक्त स्त्राव होणं सामान्य आहे. परंतु काही परिस्थितींमध्ये, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन, पीसीओएस, रजोनिवृत्ती किंवा गर्भधारणेच्या सुरुवातीसारख्या काही समस्यांचं लक्षण देखील असू शकतं.

तपकिरी रंग येण्यामागे कारण?

  • मासिक पाळीच्या सुरुवातीला काळात 
  • गेल्या महिन्यात येईन गेलेल्या मासिक पाळीतील उर्वरित रक्त ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी त्याचा रंग तपकिरी असू शकतो.
  • मासिक पाळीच्या शेवटी
  • गर्भाशयात पिरीयड्स दरम्यान दीर्घकाळ रक्त राहिलं असेल तर पाळीनंतर ब्राऊन ब्लड येऊ शकतं.

मासिक पाळीदरम्यान तपकिरी रक्त येण्यामागे असामान्य कारणं

  • अति रक्तस्राव ब्लिडींग
  • रक्ताला दुर्गंध येणं
  • प्रचंड वेदना होणं
  • सामान्य दिवसांपेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होणं
  • रक्ताच्या गुठळ्या तयार होणं