मुंबई : देशावरून अजून कोरोनाचं संटक टळलेलं नाही. दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय. अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एक अभ्यासानुसार, कोरोनाची लागण झालेली लहान मुलं 6 दिवसांत बरी झाली आहेत तर ज्या मुलांमध्ये लक्षणं 4 आठवड्यांपेक्षा अधिक काळ दिसून आली आहेत अशा मुलांची संख्या फार कमी आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, Lancet Child and Adolescent Health जर्नलनध्ये छापण्यात आलेल्या रिसर्चप्रमाणे, मुलांमध्ये दीर्घकाळ कोरोनाची लक्षणं राहण्याचा धोका फार कमी प्रमाणात पहायला मिळाला. हा अभ्यास लहान मुलांचे आई वडिल आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांद्वारे अॅपच्या मदतीने दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलाय.
किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानुसार, कोरोनाची लक्षणं दीर्घकाळ राहणाऱ्या मुलांची संख्या फार कमी आहे. वयस्कर लोकांमध्ये कोरोनानंतर याचा दीर्घकाळ प्रभाव दिसून येतो.
या अभ्यासानुसार, ज्या मुलांची कोरोना टेस्च पॉझिटीव्ह आली त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली. या अभ्यासात स्मार्टफोनच्या मदतीने ब्रिटनमधील 2.5 लाख बालकांचा समावेश करण्यात आला होता. हा अभ्यास सप्टेंबर 2020 के फेब्रुवारी 2021 या काळात घेतला गेला.
1,734 मुलांना संसर्ग झाल्यानंतर त्यांना लक्षणं दिसू लागली. ते बरे होईपर्यंत त्यांची लक्षणं नियमितपणे पाहिली गेली. ही मुलं सरासरी सहा दिवस आजारी होती. पहिल्या आठवड्यात मुलांमध्ये तीन लक्षणं दिसली. दरम्यान, हे सौम्य होते आणि सहसा लगेच बरी झाली.